रविना टंडनने दाखवला बाॅलीवूडचा खरा चेहरा; सांगीतली तिच्यासोबत झालेली धोकेबाजी

आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेक मित्र खुप खास असतात. कारण हे मित्र आपल्याला आपल्या कठीण काळात मदत करतात. ज्या वेळी आपल्यासोबत कोणीच नसते. त्यावेळी आपले हे मित्र आपल्यासोबत असतात.

बॉलीवूड कलाकारांच्या आयुष्यात देखील असे अनेक मित्र आहेत. आज आपण अशाच एका मित्राबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने रविना टंडनच्या कठीण काळात तिची मदत केली होती. हा मित्र होता अभिनेता सुनील शेट्टी.

सुनील शेट्टी आणि रविना टंडनने ‘मोहरा’ चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. त्यावेळी या दोघांमध्ये खुप चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे सुनील शेट्टीने रविना टंडनची मदत केली.

हा किस्सा आहे १९९४ चा. त्या वर्षी मोहरा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, रविना टंडन आणि सुनील शेट्टी एकत्र काम करत होते. या चित्रपटाच्या शुटिंग वेळी अक्षय कुमार आणि रविना टंडनने एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती.

मोहरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील सर्व गाणी सुपर डुपर हिट झाली होती. त्यामूळे या चित्रपटात काम करणारे सर्व कलाकार रातोरात स्टार झाले होते.

अक्षय कुमारला या चित्रपटानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. त्यामुळे तो देखील अनेक चित्रपट साइन करत होता. तो त्याच्या करिअरवर लक्ष देत होता. अक्षयने अनेक चित्रपटांना होकार दिला होता.

पण रविना टंडन मात्र सर्व चित्रपटांना नकार देत होती. तिने साइन केलेल्या सर्व चित्रपटांची शुटिंग पूर्ण करून घेत होती. कारण रविनाला तिच्या आयुष्यात पुढे जायचे होते. रविना टंडन तिच्या लग्नाची तयारी करत होती.

रविनाचे अक्षय कुमारवर खुप जास्त प्रेम होते. रविना आणि अक्षयने साखरपुडा देखील केला होता. त्यानंतर रविना अक्षयसोबत लग्न करण्याचे स्वप्न बघत होती. तिने लग्नाची तयारी सुरू केली होती. लग्नानंतर ती बॉलीवूड सोडणार होती.

पण अक्षय कुमार मात्र लग्न करण्याची तयारी करत नव्हता. तो त्याच्या करिअरमध्ये व्यस्त झाला होता. त्याच्या चित्रपटाच्या शुटिंग सुरू होत्या. रविनाने मात्र अक्षय कुमारसाठी अनेक चित्रपट नाकारले होते.

ज्यावेळी रविनाने अक्षयला लग्नाबद्दल विचारले त्यावेळी तो लग्नाचा विषय टाळत होता. रविनाचा खुप वेळ वाया जात होता. मीडियामध्ये रविना बॉलीवूड सोडून निघून जाणार आहे. अशा बातम्या येत होत्या.

या सर्व गोष्टींमुळे रविना खुप परेशान झाली होती. दुसरीकडे अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले जात होते. ‘खिलाडी’ चित्रपटाच्या शुटिंग वेळी अक्षय कुमार आणि अभिनेत्री रेखाच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

हे सगळं काही बघून शेवटी रविना टंडनने अक्षय कुमारसोबत ब्रेकअप केले. त्या दोघांचा साखरपुडा तुटला. रविना खुप दुःखी होती. एकीकडे रविनाने सर्व चित्रपट नाकारले होते. त्यामुळे तिच्याकडे काम नव्हते. दुसरीकडे अक्षय कुमारने तिला धोका दिला होता.

रविना खुप परेशान झाली होती. तिचे करिअर संपले होते. पण या कालावधीमध्ये तिला तिच्या मित्राने मदत केली. हा मित्र होता सुनील शेट्टी. सुनील शेट्टीने रविना टंडनला सांभाळले.

सुनील शेट्टी रविनाला घेऊन त्याच्या घरी गेले. अनेक दिवस रविना त्यांच्या घरी राहत होती. सुनील शेट्टीमूळेच रविना डिप्रेशनमधून बाहेर आली होती. एवढेच नाही तर सुनील शेट्टीने रविनाला तिच्या करिअरमध्ये पण मदत केली होती.

सुनील शेट्टीने रक्षक चित्रपटात रविनाला एका गाण्याची ऑफर दिली. हे गाणं खुप हिट झाले. त्यानंतर रविनाला परत बॉलीवूडमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली.

रविनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, सुनील शेट्टी तिचा सर्वात चांगला मित्र आहे. तिच्या वाईट दिवसांमध्ये बॉलीवूडमधून फक्त सुनील शेट्टीनेच तिला मदत केली होती. त्याच्यामूळेच ती बॉलीवूडमध्ये परत येऊ शकली’.

बॉलीवूड खुप मोठे आहे. पण बॉलीवूडमध्ये तुमच्या वाईट दिवसांमध्ये कोणीच तुमची साथ देत नाही. सर्वजण तुम्हाला एकटे सोडून निघून जातात आणि हाच बॉलीवूडचा खरा चेहरा आहे. पण माझ्याकडे एक चांगला मित्र होता. त्यामूळे मी इथे राहू शकले. असे देखील रविनाने सांगितले. एवढ्या वर्षांनंतरही या दोघांची मैत्री कायम टिकून आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

ऐश्वर्या राय चक्क विवाहीत शिक्षकाच्या प्रेमातच वेडी झाली होती; स्वत:च दिली कबूली

रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना सोडणार नाही; पहा कुणी दिलीय ही धमकी

कारगिल युद्धात जीवाची बाजी लावत जवानांचे प्राण वाचवणारी रणरागिनी; वाचा थरारक किस्सा

एकेकाळी ज्या अभिनेत्याला करिष्माने हाकलून दिले होते तो पुढे जाऊन बाॅलीवूडचा स्टार झाला

भारतात ड्रग्ज कायदेशीर करा; ‘या’ बाॅलीवूड अभिनेत्याने केली धक्कादायक मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.