दोन शेंड्या बांधणाऱ्या रणवीर सिंहची आगळीवेगळी अदा!! फोटो पाहून चाहते झाले फिदा…

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी चर्चेत असतोच पण त्याचप्रमाणे तो त्याच्या पेहरावासाठी आणि लूकसाठी सुद्धा अनेकवेळा चर्चेत आला आहे. नुकतेच तो पुन्हा एकदा असाच काहीसा चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांना त्याचा हा लूक आवडला आहे तर काही लोक त्याला ट्रोल करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये त्याचा अनोखा लूक पाहायला मिळत आहे. यावेळेस त्याने रणवीरने फॉर्मल पॅन्ट आणि ब्लेझर परिधान केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये त्याने हेअरस्टाईलमध्ये एका खाली एक असे दोन बो बनवले असून त्याच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. काळ्या रंगाचं मास्क आणि सनग्लासेस सोबत गळ्यात स्टायलिश पेंडंट घातले आहे.

रणवीर सिंग ही अनोखी फॅशन करून साऊथचा अभिनेता राम चरण आणि कियारा अडवाणीच्या एका आगामी चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी गेला होता. अशा प्रकारची केशरचना केल्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यानी अनेक मिम्स तयार केले आहेत.

याआधीही रणवीर सिंग त्याच्या काही फोटोजमुळे चर्चेत राहिला होता यामध्ये त्याने निळ्या रंगाची भडक जर्सी (स्वेटशर्ट) अशा प्रकारचे कपडे परिधान केले होते यामुळेही तो ट्रोल झाला होता. रणवीरने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

रणवीर सिंग याची आगळीवेगळी स्टाईल प्रथमच पाहायला मिळत नाही तर या आधी सुद्धा अश्या चित्र विचीत्र फॅशन त्याने केल्या आहेत. बाजीराव मस्तानीच्या वेळेस रणवीरने चक्क लेहंगा परिधान केला होता. आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या पेहरावामुके त्याला अनेकदा ट्रोल केल्याचे विचारले असता समाज काय बोलेल याची परवा न करता आपल्या मनाला वाटेल ते घालण्यास प्राधान्य देत असल्याचे रणवीरने स्पष्ट केले.

रणवीर सिंगचा आगामी चित्रपट ’83’ हा आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत दिपिका सुद्धा दिसणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या
८ वर्षांचा चिमुरडा अंध आई वडिलांसाठी बनला श्रावणबाळ! ऑटोरिक्षा चालवून करतोय कुटुंबाचा सांभाळ..
Taarak Mehta! खऱ्याखुऱ्या आयुष्यात ‘बबिता’ला डेट करतोय ‘टप्पू’, रिलेशनशिपमध्ये असल्याची रंगतेय चर्चा
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव शिवसेनेमुळे झाला असं लोकं का म्हणतात? वाचा..
लंडनची मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावी आले; आता गायी म्हशींच्या व्हिडीओतून महिन्याला ५ लाख कमावतात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.