रविना टंडनने तिच्या सवतीच्या डोक्यात फोडला होता काचेचा ग्लास; कारण ऐकून धक्का बसेल..

फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री सुंदरतेसोबतच त्यांच्या रागासाठी देखील प्रसिद्ध आहेत. त्यांना कधी आणि कोणत्या गोष्टीचा राग येईल काही सांगता येत नाही. असाच काही स्वभाव बॉलीवूडची मस्त मस्त गर्ल रविना टंडनचा देखील आहे.

तिच्या रागीट स्वभावाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी रविनाच्या रागीट स्वभावाचा सामना केला आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतील लोकं ती रागात असताना तिच्यापासून दुर राहणे पसंत करतात.

एकदा सुपरस्टार अजय देवगनने रविनाच्या रागीट स्वभावाचा सामना केला होता. तिने सेटवर सगळ्यांसमोर अजयला शिव्या द्यायला सुरुवात केली होती. पण अजयने समजूतदारपणा दाखवून हे प्रकरण थांबवले.

पण रविनाला तिचा हा स्वभाव खुप महागात पडला होता. ज्यावेळी तिने तिच्या नवऱ्याची पहिली पत्नी नताशा थडानीला शिव्या दिल्या आणि तिच्यावर हात उचलला होता. हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

रविना टंडनने २००४ मध्ये बिजनेस मॅन अनिल थडानीसोबत लग्न केले होते. रविना अनिलची दुसरी पत्नी होती. रविनाच्या अगोदर अनिलने नताशासोबत लग्न केले होते. पण थोड्या दिवसांमध्ये दोघे वेगळे झाले आणि अनिलने रविनासोबत लग्न केले.

लग्नानंतर रविनाला तिच्या पतीने पहिल्या पत्नीसोबत काहीही संबंध ठेवू नयेत असे वाटत होते. २००६ मध्ये एका पार्टीमध्ये रविना आणि नताशा समोरासमोर आल्या. पार्टीमध्ये नताशा तिच्या पतीसोबत बोलण्यासाठी आली.

रविनाने थांबवण्याचा प्रयत्न केला पण तरीही तिने ऐकले नाही. ती अनिलसोबत गप्पा मारू लागली. ही गोष्ट रविनाला सहन झाली नाही. तिने रागात येऊन नताशाच्या कानाखाली वाजवली आणि शिव्या द्यायला सुरुवात केली.

नताशाने देखील रविनाला शिव्या देत उलट उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे रविनाने हातात असलेला काचेचा ग्लास नताशाच्या डोक्यावर मारला. ज्यामुळे तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले होते. हे बघितल्यानंतर रविना पार्टीतून निघून गेली.

पण नताशाने रविना विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. काही दिवसांनी हे प्रकरण बंद झाले. रविना मात्र तिच्या स्वभावामूळे चांगलीच प्रसिद्ध झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

अक्षय कुमारच्या प्रेमात पडणे शिल्पा शेट्टीला चांगलेच महागात पडले; अजय देवगनने चित्रपटातून काढले

गोविंदाला हिट गाण्याच्या नादात जेलमध्ये खडी फोडावी लागणार होती पण….

बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन; ८८ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.