Nagpur : गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) पथकाने नवीन कामठीतील एका फार्महाउसवर शनिवारी मध्यरात्री छापा टाकून एक *रेव्ह पार्टी उघडकीस* आणली. या कारवाईत *एक बिल्डर आणि तीन प्रॉपर्टी डिलर्स यांच्यासह चार तरुणींना पोलिसांनी ताब्यात* घेतले. चौघा आरोपींना अटक करण्यात आली असून, *तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत:
* *सुनील शंकरलाल अग्रवाल (वय ६१)* – रामलक्ष्मी कॉलनी, कामठी येथील रहिवासी आणि फार्महाउसचा मालक.
* *गौतम सुशील जैन (वय ५१)* – रामदासपेठ, नागपूर.
* *नीलेश बाबुलाल गडिया (वय ६१)* – कमल पॅलेस, रामदासपेठ.
* *मितेश मोहनलाल खक्कर (वय ४८)* – कमल पॅलेस, रामदासपेठ.
सुनील अग्रवाल हे स्थानिक *बिल्डर असून उर्वरित तिघे प्रॉपर्टी डिलर* आहेत. रेव्ह पार्टीचं आयोजन आणि पोलिस कारवाईचा तपशील*
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, *‘एस फार्म’ नावाच्या फार्महाउसवर* शनिवारी रात्री म्हणजेच सॅटरडे नाइटला सुनील अग्रवाल यांनी खास *रेव्ह पार्टीचे आयोजन* केले होते. यासाठी *मुंबईहून चार तरुणींना खास बोलावण्यात आले* होते. पार्टीदरम्यान *एमडी (मेथेड्रोन) सारखा अमली पदार्थ, हुक्का आणि मद्याचे सेवन* सुरू असल्याचे निदर्शनास आले.
गुन्हेशाखेचे उपायुक्त *राहुल माकणीकर यांना* मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, साहाय्यक पोलिस आयुक्त *अभिजित पाटील, निरीक्षक **गजानन गुल्हाने, महिला अधिकारी **ललिता तोडासे, आणि त्यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी **रविवारी पहाटे १ वाजता* फार्महाउसवर छापा टाकला.
छाप्यात आढळलेले साहित्य आणि अटक*
पोलिसांनी या कारवाईत खालील गोष्टी जप्त केल्या:
* *१.३१ ग्रॅम एमडी (मेथेड्रोन)*
* *हुक्का उपकरणे व सुगंधित तंबाखू*
* *दारूच्या अनेक बाटल्या*
* *६ मोबाइल फोन्स*
* *२ कार*
* *संपूर्ण कारवाईत एकूण २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल*
या प्रकरणी नवीन कामठी पोलिस ठाण्यात *अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act)* तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरुणींची चौकशी आणि ड्रग्ज पुरवठ्याचा शोध पोलिसांनी ज्या चार तरुणींना ताब्यात घेतले, त्या सर्वजणी **मुंबईतील रहिवासी* आहेत. त्यांच्याकडून चौकशी सुरू असून, त्यांना कोणत्या एजन्सीमार्फत बोलावण्यात आले, याचाही शोध सुरू आहे. याशिवाय, *सुनील अग्रवाल यांना एमडीचा पुरवठा कोणी केला, याचा तपास* गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
पोलीस आयुक्तांचा कठोर आदेश आणि ड्रग्जविरोधी मोहीम*
नागपूरचे पोलीस आयुक्त *डॉ. रवींद्रकुमार सिंगल* यांनी संपूर्ण शहरात *‘अमली पदार्थमुक्त नागपूर’* ही मोहीम सुरू केली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत पोलिसांनी १०३ ड्रग्ज तस्करांना अटक* केली असून, त्यांच्याकडून सुमारे *१.२५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त* करण्यात आले आहेत.
या घटनेने नागपूर परिसरात *वाढती ड्रग्ज पार्टी संस्कृती आणि रेव्ह पार्टी ट्रेंड* यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई करत गुन्हेगारी साखळी उघड करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, *फार्महाउस, रिसॉर्ट्स आणि इतर खाजगी स्थळांवर कडक नजर ठेवण्याचे संकेत* दिले आहेत.
rave-party-disrupted-in-nagpur-four-young-women-from-mumbai-found-drunk