काय सांगता! बजरंगबलीच्या नावाने बनवण्यात आलं रेशनकार्ड, महिन्याला घेत आहेत गहू, तांदळाचा लाभ

राजस्थान | कोरोनाच्या काळात सरकारकडून गोरगरीबांना धान्याचा पुरवठा करण्यात आला होता. रेशनकार्ड ज्यांच्याजवळ आहे त्यांना लॉकडाऊनमध्ये गहू, तांदूळ मिळालं होतं. कुणी उपाशी राहू नये यासाठी सरकारकडून अनेक गरीबांची मदत करण्यात आली होती. राजस्थानमध्ये एका गावात चक्क देवाच्या नावावर रेशनकार्ड बनवून सरकारकडून महिन्याला रेशन मिळवत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

राजस्थानमधील भरतपूरमध्ये सरकारने पाठवलेलं रेशन चक्क बजरंगबलीच्या नावावर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बजरंगबलीच्या नावाने एक रेशनकार्डही आहे. त्यावर बजरंगबलीचा फोटो देण्यात आला आहे. तसेच कार्डावर पाच सदस्यांची नावे देण्यात आली आहे.

‘ढूंढारवाले हनूमान’ या नावाने रेशनकार्ड आहे. बजरंगबलीचं वय ८१ वर्ष देण्यात आलं आहे. गावचा पत्ता ग्राम पंचायत रूद्रावल, भरतपूर असं नमूद करण्यात आलं आहे. दर महिन्याला त्यांच्या नावाने रेशन येत असून त्याचा लाभही ते घेत आहेत.

अन्न व नागरी पुरवठा विभागाला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. देवाच्या नावावर रेशन घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करू असं अन्न पुरवठा अधिकारी सुभाष गोयल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
जाणून घ्या आज काय करतात अभिनेते विनोद मेहराची मुलं?
१ एप्रिलपासून नवी योजना सुरू, एकदा भरलेल्या प्रीमियमवर आयुष्यभरासाठी पेन्शन; जाणून घ्या
मुक्या प्राण्याला पाव खायला घालणे वृध्दाच्या आले अंगलट, वनविभागाने बजावली नोटीस
गावच्या पोलिस पाटलावर हात उचलणे पडणार महागात, होणार ‘ही’ मोठी कारवाई

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.