आंदोलकांबद्दल केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; ‘…तर शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं’

मुंबई | हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्याविरुद्ध चलो दिल्ली आंदोलन तीव्र केले. कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच आहे. या आंदोलनाची धार वाढत चालली असून शेतकरी आंदोलक शांततापूर्ण वातावरणात थंडीमध्ये आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

अशातच हरीयाणामधील अंबाला येथे रेल्वे पूलाचे भूमिपुजन करण्यासाठी आलेले केंद्रीय राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाला संतापून कटारिया यांनी जर शेतकऱ्यांना विरोधच करायचा आहे आणि काळे झेंडेच दाखवायचे आहेत तर त्यांनी दुसरीकडे जावून मरावे,’ असे कटारिया यांनी म्हटले आहे.

याबाबतचे वृत्त न्यूज १८ हिंदीने दिले आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांना देव सद्बुद्धि देवो अशी मी हात जोडून प्रार्थना करतो असंही म्हटले आहे. तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कटारिया हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले असता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन सुरूच आहे. हे आणखी तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या
‘…अन् पोलिसांनी थेट राजू शेट्टींच्या कॉलरला घातला हात’, आंदोलनात कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने
मुंबईत ‘सुपर स्प्रेडर’चा धोका वाढण्याची शक्यता, BMC कडून ‘मास टेस्टिंग’ची मोहिम
काही महिन्यांत भारतीयांना मिळणार प्रभावी कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.