२६/११: रतन टाटांनी शेअर केली ह्दय जिंकणारी पोस्ट; आश्रू होतील अनावर

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी १२ वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर रोजी मुंबई हादरवली होती. २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांनी ताज हॉटेलसह अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. मुंबई हल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी ताज हॉटेलची एक चित्र शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

टाटा यांनी हॉटेल ताजचे एक चित्र शेअर केले आणि त्यावर लिहिले की, “आम्हाला आठवते.” यासह आपल्या संदेशात ते लिहितात, “१२ वर्षांपूर्वी झालेला विनाश कधीही विसरणार नाही. परंतु त्याहून अधिक संस्मरणीय म्हणजे मुंबईकरांनी ज्या दिवशी दहशतवाद आणि विनाशाचा अंत केला त्या दिवशी.”

“सर्व मतभेद विसरुन एकत्र आले आणि शत्रूवर विजय मिळविण्यासाठी बलिदान देणाऱ्यांना आपण गमावले, आज आपण नक्कीच त्यांच्याबद्दल शोक करु शकतो परंतु, आपण राखून ठेवलेल्या ऐक्य, दयाळूपणे आणि संवेदनशीलतेच्या कृत्यांचे देखील आपल्याला कौतुक करावे लागेल आणि ही आशा आहे की हे येत्या काळात आणखी वाढेल.” अशी पोस्ट टाटांनी केली.

६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तोयबाचे १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि गोळीबारात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ लोकांना जीव गमवावा लागला होता. तसेच अनेकजण जखमी झाले होते.

पंढरीचा पैलवान गेला! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तडफदार आमदार भारत भालके यांचं पुण्यात निधन

प्रिटी माईक: सध्या पूर्ण जगात चर्चेचा विषय ठरलेला युवक ज्याच्या सहा बायका गर्भवती आहेत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.