बुडत्याला काडीचा आधार! एअर इंडियाच्या खरेदीत टाटाची उडी; कंपनी बुडणार की गगनभरारी घेणार?

एअर इंडियावर सध्या 52,000 कोटी रुपयांचे प्रचंड कर्ज आहे. सरकारने यासाठी 30,000 कोटी रुपयांचे बेलआउट पॅकेज मंजूर केले आहे. त्यापैकी 24,000 कोटींची रक्कम देखील देण्यात आली आहे. 2013 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी सांगितले होते की, जेव्हा एअर इंडियाचे खाजगीकरण केले जाईल, तेव्हा (टाटा) समूहाला याबाबत विचार करण्यास आनंद होईल.

टाटा समूह देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात आधीच अस्तित्वात आहे. टाटा समूहाने मलेशियन कंपनी एअर एशियाच्या सहकार्याने एअर एशिया इंडिया आणि सिंगापूर एअरलाइन्सच्या संयुक्त उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली आहे.

उद्योगपती रतन टाटा यांनी एअर इंडिया खरेदी करण्यासाठी बोली सादर केली आहे. जर टाटा सन्स भारताची सरकारी एअरलाईन एअर इंडिया खरेदी करण्यात यशस्वी झाली,तर टाटा सन्स आपली कमी किमतीची कंपनी एअर एशिया इंडियाला एअर इंडियाच्या छताखाली आणण्याचा प्रयत्न करेल.

या प्रकरणाशी संबंधित एका उच्च कार्यकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. काही काळानंतर संपूर्ण सेवा वाहक विस्तारा देखील एअर इंडिया अंतर्गत आणले जाऊ शकते. विस्तारा हा टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम आहे, ज्यामध्ये त्याची 49 टक्के हिस्सेदारी आहे.

मलेशियाच्या एअर एशिया बीएचडीचा एअरएशिया इंडियामध्ये 16% हिस्सा आहे. या प्रकरणाशी निगडीत एका कार्यकारी अधिकाऱ्याने म्हटले आहे की, मार्च 2022 नंतर एअरएशिया इंडियाचा मलेशियन भागीदार 18 दशलक्ष डॉलर्सला आपला भाग विकून कंपनीतून बाहेर पडू शकतो.

भारताची सरकारी विमान कंपनी एअर इंडिया खरेदी करण्यासाठी टाटाने 15 सप्टेंबर रोजी आर्थिक बेड जमा केले आहे. यासोबतच स्पाइसजेटचे प्रवर्तक अजय सिंह हेही एअर इंडिया खरेदी करण्याच्या शर्यतीत सहभागी आहेत.

सरकारने एकदा संसदेत दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया प्रचंड तोट्यात असून जर तिचे खाजगीकरण केले नाही तर टाळे लावायची वेळ येईल. एवढी बिकट परिस्थती असताना देखील कंपनी मधील कर्मचाऱ्यांनी सरकारच्या या निर्गुंतवणुकीच्या प्रस्तावाला विरोध केला होता. टाटा हे त्यांच्या दानशूरपणा सोबतच त्यांच्या मुत्सदीपणामुळे देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे जर एअर इंडिया टाटा सन्सच्या हाथी गेली तर ती बुडेल की गगनभरारी घेईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

महत्वाच्या बातम्या
मी शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन सांगतो मी चुकीचं काही केलं नाही, या शिवसेना नेत्याने दिली प्रतिक्रिया 
‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगीही मोदी सरकारने द्यावी, वऱ्हाडींचा खर्चही उचलावा’
ऐश्वर्या राय रेखाला काय नावाने बोलावते माहीतीय का? ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल
“दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, ठाकरे पवारांना अखेर सोमय्यांसमोर झुकावेच लागले”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.