म्हणून तीन दिवस रतन टाटा ताज हॉटेलच्या बाहेर पादचारी मार्गावरच थांबले होते

मुंबई | मुंबईतील ताज महाल हॉटेलला २६/११ हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. मुंबईची शान असलेले हे हॉटेल टाटा समूहाच्याच मालकीचे आहे. यामुळे सहाजिकच टाटा समूहाचे आधारस्तंभ रतन टाटांनी २६/११ हल्ला खूप जवळून पाहिला होता.

दहशतवादी हल्ला झाल्याचे समजताच रतन टाटा स्वतः तिथे उपस्थित होते. यावेळी ताज हॉटेलमध्ये गोळीबार चालू असल्याने सुरक्षा रक्षकांनी यांना आत जाऊ दिले नसल्याचे एका मुलाखतीदरम्यान रतन टाटा यांनी स्वतः या घटनेबद्दल माहिती दिली आहे.

याबाबत सांगताना रतन टाटा म्हणतात, ‘२६ नोव्हेंबर २००८ रोजी मला फोन आला की, ताजमध्ये गोळीबार झाला आहे. त्यानंतर मी तातडीने ताजच्या एक्सचेंजला फोन केला, पण त्यावेळी कोणी फोन उचलला नाही. मग मी स्वतः गाडी घेऊन तिथे गेलो, असे त्यांनी सांगितले.

तसेच यानंतर रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आर. के. कृष्णकुमार यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. २६/११ हल्ल्याबाबत सांगताना आर. के. कृष्णकुमार म्हणाले, ‘ताजमध्ये काहीतरी गडबड झाली असल्याचे रतन टाटा यांनी मला फोन करून सांगितले.

दरम्यान, पुढे याबाबत सांगताना आर. के. कृष्णकुमार म्हणतात, या घटनेवेळी रतन टाटा हे ताजमधील व्यवस्थापन आणि तेथील कर्मचाऱ्यांसोबत होते. २६/११ रोजी झालेल्या हल्लानंतर देखील रतन टाटा यांनी पुढचे तीन दिवस आणि तीन रात्र पादचारी मार्गावरच काढले, असे कृष्णकुमार यांनी सांगितले.

‘२६/११च्या दहशतवादी हल्लाने माझे आयुष्य बदलून टाकले. ही घटना इतकी भीषण होती की, पुढचे सहा महिने मला धड बोलताही येत नव्हते, माझा आवाज कापत होता, जखमींची अवस्था पाहून मन अस्वस्थ व्हायचे. हे सगळं जवळून अनुभवल्यानंतर मी खूप हळवा व्हायचो, अशा भावना रतन टाटा यांनी व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या
तुमच्या मोबाईलच्या स्क्रिनवर किती वेळ राहू शकतो कोरोना विषाणू? समोर आली धक्कादायक माहिती
काजूपेक्षाही उपयुक्त चीलगोजा ड्रायफ्रूट; वजन कमी करायला व प्रतिकारशक्ती वाढीला रामबाण
केवळ आईसक्रीमसाठी अजय देवगनने १० तास थांबवली शुटींग; पहा नेमकं काय घडलं..
भरातलं करीअर सोडून विनोद खन्ना ओशो आश्रमात का गेले होते? अखेर मुलगा अक्षयने केला खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.