२६/११ चा दहशतवादी हल्ला कोणाला आठवत नाही. त्या भ्याड हल्ल्याचे आजही चित्र डोळ्यासमोरून जात नाही. अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. परंतू हल्ल्यानंतर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हल्ल्यानंतर तब्बल तीन दिवस ताज हॉटेलसमोरच्या फूटपाथवर थांबून होते.
हा हल्ला झाला त्यावेळी हॉटेलमध्ये ३००पाहुणे होते. अनेक ठिकाणांवरून हॉटेलमधील ग्राहकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. यात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खूपच कष्ट घ्यावे लागले. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची काही योजना नसतानाही त्यांनी अनेकांना सुखरूपपणे बाहेर काढले.
पण हे सारे करताना त्यापैकी काही जणांना आपला प्राण गमावावे लागल्याचे टाटा यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. या संकट प्रसंगामध्ये रतन टाटा हे ताजच्या व्यवस्थापनाबरोबर आणि तेथील कर्मचाऱ्यांसोबत खंबीरपणे उभे होते.
हल्ला झाल्यापासून पुढील तीन दिवस तीन रात्री त्यांनी हॉटेलच्या बाहेरील पदपथावरच काढल्याचे टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आर. के. कृष्णकुमार यांनी म्हटले आहे. तसेच ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर रतन टाटा स्वत: तिथे पोहाेचले होते. पण हॉटेलमध्ये गोळीबार होत असल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी त्यांना आतमध्ये जाऊ दिले नाही.
संजय दत्तच्या गर्लफ्रेंडला किस केल्यामुळे धर्मेंद्रने खाल्ला होता संजू बाबाचा मार
या प्रकरणाची देशात चर्चा! वरासोबत घेतले सात फेरे, आणि त्याच रात्री प्रियकरासोबत फरार झाली वधू….