‘मला भारतत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा’ रतन टाटांचे भावूक अवाहन

मुंबई | रतन टाटा भारताचे एक असे उद्योगपती आहेत जे फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. ते सध्या टाटा गृपचे अध्यक्ष आहे. भारतात प्रतिष्ठीत उद्योगपतींनमध्ये त्यांचे नाव आहे, त्यांना त्यांच्या समाजसेवांच्या कामामुळे खास ओळख मिळाली आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर त्यांना भारतरत्न देण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, मोटिवेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी रतन टाटा यांना भारतरत्न द्या अशी मागणी ट्विटवर केली. यानंतर सोशल मीडियावर #BharatRatnaForRatanTata असा हॅशटॅग ट्रेंड सुरु झाला. या सोशल मीडियावरील मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्विट करून मला भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा असं भावूक अवाहन केले आहे.

रतन टाटा यांनी शनिवारी सकाळी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले, ‘’मला भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. परंतु माझी एक विनंती आहे की, ही मोहिम थांबवावी. मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान कायम देत राहील’’

रतन टाटा हे अनेकांच प्रेरणास्थान आहेत. टाटा यांना २००० मध्ये सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार म्हणजेच पद्म भुषण पुरस्कार देण्यात आला होता. तसेच २००८ मध्ये त्यांना पद्म विभुषण पुरस्कारही देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
भारतीयांची कॉलर ताठ! रतन टाटांची टीसीएस कंपनी ठरली जगात सर्वात मोठी कंपनी
पहील्या नोकरीच्या वेळी रतन टाटांसोबत घडला होता मजेदार किस्सा; टाटा स्वत:च सांगताहेत..
मुंबईकरांच्या ‘त्या’ भावनिक क्षणामुळे आनंद महिंद्राही झाले भावूक, प्रार्थना करत म्हणाले..
राष्ट्रीय पुरस्कार मिळत नसल्याने गायक कुमार सानुंनी व्यक्त केली खंत, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.