Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

ratan tata : कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यााठी रतन टाटांनी स्वतःच विमान…; वाचा २००४ ‘तो’ भन्नाट किस्सा

Mayur Sarode by Mayur Sarode
January 5, 2023
in ताज्या बातम्या
0
ratan tata

ratan tata prakash telang incident  | प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा हे फक्त भारतात नाही तर जगात मोठे नाव आहे. ते तरुणांसाठी एक आदर्श आहे. व्यवसायात कसे यश मिळवावे, माणुसकी कशी जपावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा. त्यामुळे प्रत्येक भारतीय त्यांचा आदर करतो.

रतन टाटा यांच्या अनेक चांगल्या कामांमुळे लोक त्यांचा आदर करतात. रतन टाटा हे कर्मचाऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. त्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अनेक किस्से सुद्धा आहे. आता आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत.

एका कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी रतन टाटा यांनी थेट विमान उडवण्याची घाई केली होती. त्यांच्या या कृतीतून ते चांगल्या उद्योजकासोबतच किती चांगले माणूस होते, हे दिसून येते. हा किस्सा २००४ मधला आहे.

२००४ मध्ये पुणे येथील टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश एम तेलंग यांची तब्बेत अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना तातडीने एअरलिफ्टने मुंबईला नेण्यास सांगण्यात आले. कारण त्यादिवशी रविवार होता.

रविवार असल्याने अँबुलन्सच्या व्यवस्थेत अडथळा निर्माण होणार होता.रतन टाटा यांना ही अडचण कळाली. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या विमानाकडे धाव घेतली. त्यांनी विमान उडवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्वाची वाटत नव्हती. त्यामुळे कुठलाही विचार न करता त्यांनी हा निर्णय घेतला होता.

रतन टाटा विमानात बसले सुद्धा होते. पण तोपर्यंत व्यवस्थापनाने एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था केली. त्यानंतर तेलंग यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेलंग यांनी २०१२ पर्यंत कंपनीत सेवा बजावली. त्यानंतर ते निवृत्त झाले. त्याचवर्षी रतन टाटा यांनी देखील संचालक पदावरुन निवृत्ती घेतली.

महत्वाच्या बातम्या-
ved  : रितेशचा ‘वेड’ ठरतोय सुपरहिट, थिएटरवाल्यांना बंद करावे लागले अवतार २ अन् सर्कसचे शो
raj thackeray : आता जैन धर्मियांसाठी राज ठाकरे मैदानात! सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
भारत vs श्रीलंका दुसरा T20 सामना आज; वाचा कधी, कुठे आणि कसा Live पाहता येईल हा सामना

Tags: prakash telangRatan tataTataटाटाप्रकाश तेलंगरनन टाटा
Previous Post

‘मी माझा नंगानाच सुरूच ठेवणार, जे करायचं ते करा..’; उर्फी जावेद आता आणखीनच आक्रमक

Next Post

Ranji trophy : ना कोहलीने विश्वास दाखवला ना रोहितने संधी दिली, पुण्याच्या खेळाडूने धडाकेबाज द्विशतक झळकावत दिले सडेतोड उत्तर

Next Post

Ranji trophy : ना कोहलीने विश्वास दाखवला ना रोहितने संधी दिली, पुण्याच्या खेळाडूने धडाकेबाज द्विशतक झळकावत दिले सडेतोड उत्तर

ताज्या बातम्या

अमोल कोल्हे अमृता खानविलकर सोबत करणार लग्न! उपमुख्यमंत्रीही होणार? स्वत:च पोस्ट करत म्हणाले…

April 2, 2023

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, जागीच मृत्यू; अवघ्या २५ सेकंदात होत्याचं नव्हतं..

April 2, 2023

‘तुम्ही एकदा कोल्हापूरला याच मग…’, संभाजीराजेंनी महंतांना ठणकावले; संयोगिताराजेंबाबत म्हणाले, त्यांनी…

April 2, 2023

आता ऊसाच्या रसावरही लागणार १२ टक्के GST; सरकारचा मोठा निर्णय

April 2, 2023

शेजाऱ्यांच्या घरात मध्यरात्री भयानक आक्रोश, खिडकीतून पाहील्यावर दिसले की पोराने ३८ सेकंदांत ४७ वेळा…

April 1, 2023

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तुफान राडा! सुरक्षा जवान आणि भक्तांमध्ये जुंपली, भक्तांना बेदम मारहान

April 1, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group