तब्बल ९६ कंपन्यांचे मालक आहेत रतन टाटा, त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा वाचून अवाक व्हाल

भारताची भूमी ही नेहमीच महान व्यक्तींना जन्म देणारी भूमी राहिली आहे, अशाच एका महान माणसाची म्हणजे रतन टाटांची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज भारतातील अनेक लोक त्यांना देव मानतात त्यामागे अनेक कारणे आहेत. रतन टाटा आपल्या उदार मनासाठी जगप्रसिद्ध आहेत.

आमच्या आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला रतन टाटा फॅमिली ट्री, रतन टाटा नेट वर्थ आणि रतन टाटांच्या संबंधित सगळी महिती देणार आहोत. महान भारतीय उद्योजक रतन टाटा हे सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. ज्यांनी 1991 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

28 डिसेंबर 2012 रोजी आपल्या पदावरून निवृत्त झालेले रतन टाटा एक महान व्यक्ती आहेत. ते अजूनही चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ते त्यांच्या कामात इतके महान होते की त्यांनी संपूर्ण जगातील सगळ्यात लहान कार बनवून सगळ्यांना चकीत केले होते. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि क्षमतेने, त्यांची कंपनी टाटा ग्रुपने नवीन उंची गाठली आणि संपूर्ण जगात त्यांचे नाव रोशन केले.

रतन टाटांचा बायोडाटा
पुर्ण नाव- रतन नवल टाटा
उपनाव- आर. एन. टी
जन्म- २८ डिसेंबर १९३७
जम्नस्थान- सूरत, गुजरात, भारत
वडिलांचे नाव- नवल टाटा
आईचे नाव- सोनू टाटा
सावत्र आईचे नाव- सिमोन टाटा
काकांचे नाव- जे आर डी टाटा
भावाचे नाव- नोएल टाटा
सध्याचे वय- ८४ वर्षे
वजन- ८५ किलो
उंची- ५ फूट १० इंच
घराचा पत्ता- कुलाबा, मुंबई, भारत
धर्म आणि जात- पारशी
शाळा- कैंपियन स्कूल, मुंबई आणि कैथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, मुंबई
कॉलेज- कॉर्नेल विश्वविद्यालय, इथाका न्युयॉर्क आणि हॉर्वर्ड बिझसेन स्कूल, बॉस्टन, मॅसाचुसेट्स
अंदाजे संपत्ती- ६७४८ कोटी
पेशा- बिजनसमॅन आणि गुंतवणूकदार
पुरस्कार- पद्मविभूषण
राष्ट्रीयता- भारतीय

महान उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी भारतातील सुरत शहरात झाला. ते नवल टाटांचे चिरंजीव आहेत. नवजबाई टाटांनी पतीच्या मृत्यूनंतर त्यांना दत्तक घेतले होते. रतन टाटा फक्त दहा वर्षांचे असताना, त्यांचे आई आणि वडील एकमेकांपासून विभक्त झाले होते. यानंतर त्यांचे पालनपोषण आजी नवजबाई टाटा यांनी केले. रतन टाटा धर्माबद्दल बोलायचे झाले तर ते पारशी धर्माचे आहेत.

रतन टाटा यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमधून झाले आणि त्यांनी माध्यमिक शिक्षण कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून घेतले. त्यानंतर, रतन टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर मध्ये बी.एस. स्ट्रक्चरल अभियांत्रिकी मध्ये बी.एस. आणि 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापनाची पदवी प्राप्त केली.

त्याच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा वाढदिवस 28 डिसेंबरला असतो. त्यांच्या आईचे नाव सोनू टाटा आणि वडिलांचे नाव नवल टाटा आहे. रतन फक्त 10 वर्षांचे होते आणि त्यांचा भाऊ सात वर्षांचा होता, तेव्हाच त्याचे आई -वडील विभक्त झाले होते, ज्यामुळे त्यांना त्यांची आजी नवजबाई टाटा यांनी वाढवले. जर रतन टाटांच्या मुलाबद्दल आणि रतन टाटांच्या पत्नीबद्दल सांगायचे झाले तर ते विवाहित नाहीत.

करिअर –
त्याच्या सुरुवातीच्या कारकीर्दीबद्दल आणि मुख्य कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर ते 1961 च्या वर्षात सुरू झाले होते. सुरुवातीच्या प्रवासात त्यांनी लहानपणीच शॉप फ्लोअर सारखी छोटी कामे केली आहेत. थोड्या काळासाठी अशी सेवा दिल्यानंतर, रतन टाटा समूह आणि त्यांच्या गटात सामील झाले होते.

१९७१ मध्ये रतन टाटा रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या नेल्को कंपनीचे संचालक झाले. 1981 मध्ये रतन यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, जमशेटजी टाटा यांनी त्यांना हे पद दिले होते. त्यांच्या सावलीत टाटा उद्योगाने मोठे यश मिळवले होते.

वर्ष 1998 मध्ये रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखाली टाटा मोटर्सने टाटा इंडिका ही नवी भारतीय कार बाजारात आणली. या गाडीने टाटा समूहाची ओळख हळूहळू जगभरात वाढली आणि एक नवीन स्थान प्राप्त झाले ज्यानंतर टाटा कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात आपले पाय रोवले होते.

नेट वर्थ
जर भारताच्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या माहितीमध्ये रतनजींच्या उत्पन्नाची आणि एकूण मालमत्तेची माहिती सांगितली गेली, तर कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नाचा किंवा संपत्तीचा अंदाज लावणे फार कठीण आहे, जे 6748 कोटी असल्याचे सांगितले जाते, परंतु सोशल मिडीयाच्या अहवालानुसार या आकड्यांची माहिती मिळाली आहे.

तसे, त्यांच्याकडे बरीच संपत्ती आहे असे मानले जाते कारण त्याचे नाव भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींमध्ये घेतले जाते. असे बोलले जाते की, रतन टाटा यांची एकूण संपत्ती 77,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मनोरंजक पण खरी गोष्ट अशी आहे की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती दुसरे कोणी नसून आपल्या देशातील रतन टाटा आहेत.

अगदी रतन टाटांच्या कंपन्या जगातील पहिल्या 10 श्रीमंत लोकांपेक्षा जास्त पैसे कमवतात. या सगळ्यामागील कारण म्हणजे रतन टाटा आपल्या वैयक्तिक आणि कंपनीच्या वार्षिक उत्पन्नाच्या 65% दान करतात. भारताचा टाटा समूह ही जगातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे.

आज टाटा समूहात 96 कंपन्या आहेत ज्यात टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी , टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा टेलिसर्व्हिसेस, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, टायटन, टाटा कम्युनिकेशन्स, ताज ग्रुप आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे.

रतन टाटा यांची लाईफस्टाईल
भारतातील उद्योगपती रतन टाटा जसे पैशांनी श्रीमंत आहेत तसेच ते मनानेदेखील श्रीमंत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल ते ज्या विनम्र पद्धतीने वागतात त्यामुळे ते पुर्ण जगात आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी खुप प्रसिद्ध आहेत.

काही दिवसांपुर्वी ते आपल्या एका आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. त्यानंतर लोकांनी त्यांची खुप प्रशंसा केली होती. कोरोनाकाळात ऐकीकडे सगळ्यांचे हाल होत होते तर रतन टाटांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा एक रूपयाही कापला नाही.

या व्यतिरीक्त रतन टाटा आपल्या लाईफस्टाईलमुळेही चर्चेत असतात. त्यांच्याकडे खुप महागड्या गाड्या आणि प्राईवेट जेट आहे. रतन टाटा यांच्याकडे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईमध्ये एक आलिशान बंगला आहे.

तो मुंबई शहरातला सगळ्यात महागड्या बंगल्यांपैकी एक आहे. आज आम्ही अशाच पाच त्यांच्या आलिशान वस्तुंबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. रतन टाटा यांच्याकडे शानदार फेरारी कॅलिफोर्निया ही कार आहे.

ही कार भारतात भेटत नाही. रतन टाटांना बऱ्याचवेळा या गाडीसोबत पाहण्यात आले आहे. भारतात या गाडीची किंमत ४.४४ कोटी इतकी आहे. रतन टाटांकडे प्राईवेट जेट आहे त्याचे नाव आहे dassault falcon.

रतन टाटांकडे dassault falcon 2000 फ्रांसमधील प्राईवेट जेट आहे. या प्राइवेट जेटमध्ये दोन इंजिन आहेत. या जेटला खासकरून फ्रांसच्या एक्सपर्ट इंजिनीअर्सची मदत घेऊन बनवण्यात आले आहे.

रतन टाटा यांच्याकडे आणखी एक लक्झरी कार आहे जिचे नाव आहे Maserati quattroporte. एका वेबसाईटच्या महितीनुसार रतन टाटांक़डे इटलीची कंपनी Maserati या कंपनीची लक्झरी कार आहे.

या गाडीची टॉप स्पीड २७० किलोमीटर प्रति तास आहे. भारतात या गाडीची किंमत २.११ कोटी आहे. रतन टाटांच्या महागड्या वस्तूंमध्ये land rover freelander गाडीसुद्धा आहे. भारतात या गाडीची सुरूवातीची किंमत ४३.१४ लाख एवढी आहे.

रतन टाटा यांचा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एक आलिशान बंगलासुद्धा आहे. या बंगल्यातून अरबी समुद्राचा खुप सुंदर नजारा पाहायला मिळतो. १५ हजार स्केअर फुटात पसरलेल्या या बंगल्याच्या टॉप फ्लोअरवर एक खुप मोठा स्विमींग पुल आहे.

या बंगल्याची किंमत करोडोंच्या घरात आहे. रतन टाटा यांना पुस्तके वाचण्याचा खुप छंद आहे. त्यांना कुत्रे पाळण्याचा छंद आहे आणि ते माऊथ ऑर्गनसुद्धा वाजवतात. रतन टाटा यांना खिशे नसलेले शर्ट घालायला आवडते.

हे शर्ट ते न्यूयॉर्कमधील ब्रुक्स ब्रदर्समधून खरेदी करतात. तर अशी आहे रतन टाटा यांची लाईफस्टाईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
तुमच्यात हिंमत असेल तर ‘त्या’ बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढा; राजू शेट्टींचे किरीट सोमय्यांना ओपन चॅलेंज
भाजपला सर्वात मोठे खिंडार! तब्बल ११ भाजप नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश
केबीसीमध्ये ‘तो’ प्रसंग पाहून जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टीच्या भावनांचा बांध फुटला, बिग बींनाही अश्रू अनावर
एकराला १८ कोटी मिळतायेत, दादा तो रस्ता आमच्या वावरातून न्या, अजितदादांनी सांगितला तो किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.