रतन टाटा देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपनीत करणार मोठी गुंतवणूक

भारताच्या रिटेल सेक्टरवर आधी ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टचे राज्य आहे. असे असताना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिटेल सेक्टरमध्ये जिओमार्ट आणले होते. पण आता प्रसिद्ध उग्योगपती रतन टाटा यांनी रिटेल क्षेत्राप पाऊल ठेवले असून आता सर्वांनाच चिंतेत पाडलं आहे.

टाटा ग्रुपही या क्षेत्रात उतरला असून त्यांनी ऑनलाईन ग्रोसरी बिग बास्केट आणि ऑनलाईन फार्मसी आयएमजी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरु केली आहे. आता टाटा ग्रुप क्योरफिटमध्ये गुंतवणूक करणार आहे.

टाटा ग्रुपने क्योरफिटला अधिग्रहण करण्याची तयारी सुरु केली. या कंपनीचे संस्थापक मुकेश बंसल यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच शेवटचा निर्णय घेण्यात येणार आहे. ते ऑनलाईन फॅशन रिटेलर कंपनी मिंत्राचे सहसंस्थापक पण आहे.

क्योरफिटने कल्टफिट नावाने रिब्रँड केले आहे. हे नवीन स्टार्टअप असले तरी या कंपनीची किंमत ४१.८ अरब डॉलर आहे. याचे मागचे व्हॅल्युएशन जवळपास ८० कोटी डॉलर इतके होते. क्योरफिटमध्ये टाटा ग्रुपने गुंतवणूक केली, तर ही कंपनी ऍमेझॉन, फ्लिपकार्टला मोठी टक्कर देऊ शकते.

मुकेश बंसल यांनी खुप कमी वेळात मिंत्राला चांगल्या स्तरावर पोहचवले आहे. याचाही फायदा टाटा ग्रुपला होणार आहे. मिंत्राला २०१४ मध्ये फ्लिपकार्टने ३३ करोड डॉलरमध्ये खरेदी केले होते. त्यानंतर मुकेश बंसल फ्लिपकार्टसोबत जोडले गेले होते.

दरम्यान, गेल्याच महिन्यात टाटा ग्रुपने बिग बास्केटची ६४ टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. टाटा समुहाने आता जवळपास १०० कंपन्या आहे. त्या सर्व कंपन्यांसाठी टाटा समुह एक सुपर ऍप लाँच करणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी प्रत्येक गोष्ट खरेदी करणे अत्यंत सोपं होणार आहे.

महेंद्रसिंग धोनी आता झाला पुणेकर, पुण्यात घेतले घर, पाहा फोटो
‘बाहुबली’तलं माहिष्मती साम्राज्य काल्पनिक नाही, याठिकाणी आहे खऱ्या अस्तित्वाची नोंद
‘इंडियन आयडॉल 12’मधून षण्मुखप्रियाला बाहेर काढण्याची मागणी फेटाळत साउथ इंडस्ट्रीने दिला पाठींबा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.