ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रतन टाटांचे न्यायालयाकडून कौतूक; केंद्राला मात्र झापले

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. तसेच रुग्णालयात ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण होऊ लागला आहे.

अशा परिस्थिती पुढाकार घेत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपने द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी २४ मोठे कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत टाटा ग्रुपने केलेल्या ट्विट केले आहे.

आता रतन टाटांनी घेतलेल्या या निर्णायावर आता उच्च न्यायलयाने त्यांचे कौतूक केले आहे. उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान टाटा ग्रुप ऑफ कंपनीचा अनेकदा उल्लेख करत त्यांच्या कामाचे कौतूक केले आहे. तर केंद्र सरकारला निर्देश दिल्यानंतरही त्यांचे पालन होत नसल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती विपिन संघी आणि न्यायमुर्ती रेखा पाटील यांच्या खंडपीठासमोर बुधवारी रात्री सुनावणी घेण्यात आली. मॅक्स हेल्थ केअरने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी घेण्यात आली होती.

मॅक्स हेल्थ केअरने ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत असल्याची तक्रार केली होती. मॅक्सने आपल्याकडे फक्त३ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक असून ४०० रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे कोर्टाला सांगितले आहे.

त्यामुळे यावेळी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलेच झापले आहे. लोकांचे जीव सरकारसाठी एवढे महत्वाचे नाहीत का? ऑक्सिजनसारख्या महत्वाच्या बाबीकडे केंद्र सरकार करत असलेल्या दुर्लक्षामुळे आम्हाला धक्का बसला आहे. ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे, त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दुसऱ्या मार्गाची सोय करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच न्यायालयाने टाटा समुहाचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारकडे ऑक्सिजन पुरवठा वैद्यकीय वापरासाठी वळवण्याचे सर्व अधिकार आणि स्त्रोत आहे. टाटा सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा करतात. टाटा हे मदतीसाठी तयार आहेत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

८५% पेशंटना रेमडेसिवीरची गरज नसते पण तरीही डाॅक्टर वापरतात; एम्सच्या तज्ञांची धक्कादायक माहिती
किशोर नांदलस्कर यांचा मृत्युपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल; त्यांच्या चेहरेवरचे हास्य पाहून तुमचेही डोळे पाणावतील
VIDEO: सेक्स एज्युकेशनच्या ‘त्या’ व्हिडिओवर अनेकांचा आक्षेप, अखेर सरकारला घ्यावं लागलं नमतं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.