जेव्हा रतन टाटा पडले होते प्रेमात पण, चीनमुळे झाला होता त्यांचा ब्रेकअप; वाचा नक्की काय झालं होतं

 

रतन टाटा भारताचे एक असे उद्योगपती आहे जे फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. ते सध्या टाटा गृपचे अध्यक्ष आहे. भारतात प्रतिष्ठित उद्योगपतींनमध्ये त्यांचे नाव आहे, त्यांना त्यांच्या समाजसेवेच्या कामांमुळे खास ओळख मिळाली आहे.

रतन टाटा सर्वांसाठीच एक आदर्श आहेत. ते अविवाहित आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला माहितीये का ? रतन टाटांनी मुलाखतींमध्ये त्यांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यात त्यांनी त्यांच्या प्रेमाबद्दलही सांगितले होते.

रतन टाटा यांचे एका मुलीवर प्रेम होते, पण सीएएस-भारत युद्धामुळे त्यांचे संबंध तुटले होते, असे रतन टाटा यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

महाविद्यालयाच्या शिक्षणानंतर मी लंडनच्या लॉस एंजेलिसमधील एका फर्ममध्ये आर्किटेक्ट म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली होती. तिथे मी दोन वर्षे काम केली होती, तिथेच मी पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, तो काळ खुप चांगला होता. माझ्याकडे एक कार होती, माझे नोकरीवर प्रेम होते आणि तिच्यावरही. मी तिच्याशी लग्न करणार होतो, पण त्याचवेळी मला भारतात परतावे लागले कारण खुप दिवस झाले होते मी माझ्या आजीला भेटलो नव्हतो. सात वर्षांपासून आजीची तब्बेत बिघडली होती.

मी आजींकडे परतलो, त्यावेळी मला वाटले की ज्या मुलीवर मी प्रेम करतो त्या मुलीने माझ्याशी लग्न करावे आणि भारतात यावे. पण त्यावेळी म्हणजेच १९६२ मध्ये भारत-चीनमध्ये युद्ध सुरु होते. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिच्या लग्नाला होकार दिला नाही. त्यामुळे तिचे आणि माझे नाते कायमचे संपले होते, असे रतन टाटांनी म्हटले होते.

रतन टाटा यांच्या आईवडीलांनी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्याने एक वेगळे वळण घेतले होते. त्यामुळे रतन टाटांच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण त्या अडचणींचा सामना कसा करायचा हे त्यांच्या आजीने त्यांना शिकवले होते. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आजीचा मोठा प्रभाव होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.