८३ वर्षे वय असतानाही रतन टाटा शिकताय ‘ही’ गोष्ट; टाटांची शिकण्याची आवड बघून लोकंही झाले हैराण

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची गणना जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींमध्ये केली जाते. टाटा हे उद्योग क्षेत्रातील असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांच्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती नसेल. त्यांनी व्यवसायात घेतलेल्या भरारीमुळे अनेक व्यवसायिक त्यांना आदर्श मानतात.

व्यवसायाव्यतिरिक्त, ते अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट लाखो लोकांचे लक्ष वेधून घेत असते. आताही त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे, या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या उद्योगपती रतन टाटा यांचे वय ८३ वर्षे आहे. पण त्यांना एखादी गोष्ट शिकायची असेल तर त्यांचा उत्साह हा एका तरुणासारखा दिसून येतो. मंगळवारी इन्स्टाग्रामवर स्वतःचा पियानो वाजवतानाचा एक फोटो शेअर केला,

रतन टाटा यांचा हा पियानो वाजवतानाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की मी हे लहानपणी थोडे शिकलो, मला अजूनही हे आणखी शिकायचे आहे. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांची शिकण्याची इच्छा पाहून नेटकरी ही हैराण झाले आहे.

पियानो वाजवताना रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी लिहिले की, मी पियानो वाजवायला थोडे लहानपणी शिकलो आणि अजूनही शिकण्याच्या विचारात आहे. सेवानिवृत्तीनंतर मला एक चांगला पियानो शिक्षक मिळाला, पण तेव्हा मी जास्त लक्ष केंद्रित करू शकलो नाही, मला आशा आहे की भविष्यात पुन्हा प्रयत्न करेन.

रतन टाटा यांच्या या फोटोला आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. यावेळी अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींनी वाजवून दाखवण्याची विनंती केली आहे, तर काही लोकांनी इतक्या वयातही शिकण्याची इच्छा तरुणांना लाजवणारी आहे, असे म्हटले आहे

रतन टाटा यांच्या आयुष्यातील प्रसंगातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे. त्यांची शिकण्याची इच्छा सर्वांना हैराण करुन टाकणारी आहे. रतन टाटा यांना अजूनही कार चालवण्याची, वाचनाची, विमान उडवण्याची आवड आहे.

महत्वाच्या बातम्या-

हे आहे जगातील ६ ठिकाणं, जिथे कधीच सुर्य मावळत नाही; जाणून घ्या कुठे आहेत ही ठिकाणं
तुरुंगातल्या नेत्याला पक्षात घेतलं म्हणून विरोधकांनी केली टीका; ओवैसींनी भाजपच्या नेत्यांचा क्रिमिनल रेकॉर्डच सांगितला
परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंध ठेवणे गुन्हा नाही; उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.