टाटा पुन्हा आले मदतीला धावून; ४० हजार बरोजगारांना देणार नोकऱ्या

कोरोनाच्या संकटात लाखो लाकोंच्या नोकऱ्या गेल्या आहे. अनेक लोक आजही बेरोगार आहे. असे असताना आता देशातील चार मोठ्या कंपन्या म्हणजेच इंफोसिस, विप्रो, टीसीएस आणि एचसीएलने मिळून १ लाख लोकांना नोकरीची सुवर्णसंधी देणार आहे.

देशातील या चार आयटी कंपनींचे काम मोठ्या प्रमाणात डिजिटल झाले आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर सर्विसची मागणी दुप्पट झाली आहे. याच मागणीच्या आधारे या चार कंपन्यांनी गेल्यावर्षीची तुलनेत ४५ टक्के जास्त नोकऱ्या युवकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

टीसीएस ही जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. त्यांनी ४० हजार नव्या लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखांपेक्षा जास्त होऊन जाईल.

इंफोसिस पण यावर्षी २५ हजार नव्या लोकांना रोजगार देणार आहे. तर एचसीएल टेक यावर्षी १२ हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करु देणार आहे. अशात विप्रो कंपनीने अजून सांगितले नाहीये, की कंपनी यावर्षी किती लोकांना रोजगार देणार आहे. पण गेल्या वर्षापेक्षाजास्त नोकऱ्या विप्रो कंपनी लोकांना देणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी विप्रो कंपनीचे चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर सौरभ गिल यांनी म्हटले आहे, की गेल्यावर्षी जितक्या लोकांना रोजगार देण्यात आला होता, त्यापेक्षा जास्त लोकांना यावर्षी रोजगार दिला जाणार आहे. विप्रोने गेल्यावर्षी ९ हजार लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत होता मंगल दोष; अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी झाडासोबत केले लग्न?
आलिशान गाड्या, मुंबईत बंगला, फ्लॅट; ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेले किशोर नांदलस्कर
केंद्र सरकारची कपटनिती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्सप्रेस ट्रेनचा खोळंबा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.