रतन टाटा म्हणजे देवमाणूस! कोरोना काळातील मदतीसाठी नेटकऱ्यांकडून टाटांना साष्टांग नमस्कार

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे टाटा उद्योग समुहाने दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून भारतीयांसाठी सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टाटांचे देशप्रेम दिसून येते. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

नरेंद्र मोदींनी सर्व नागरिकांना केलेले आवाहन कौतुकास्पद आहे. आम्ही टाटा कंपनीकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहेत ते सर्व करण्यास कटीबद्ध आहोत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आम्ही असाच एक निर्णय घेतला आहे, असे ट्विट टाटा ग्रुपकडून करण्यात आले आहे.

आता टाटा ग्रुपने द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजनची देशभरामध्ये वाहतूक करण्यासाठी २४ मोठे कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशातील ऑक्सिजन तुटवड्यावर दिलासा मिळणार आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची घोषणा टाटा कंपनीकडून करण्यात आली. तेव्हापासूनच रतन टाटांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी देवमाणूस देखील म्हटले आहे.

देशावर अनेकदा संकट आली असताना टाटांनी मोठी मदत केली आहे. यामुळे सर्व भारतीयांमध्ये टाटांचे स्थान सर्वोच्च आहे. आता या ऑक्सिजनमुळे अनेकांना फायदा होणार आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकारला उच्च न्यायालयाने झाप झाप झापले, भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या

आत्मनिर्भर महिला! या महिलांनी झेंडू फुलवून केली लाखोंची कमाई

डॉक्टर नव्हे सैतान! तपासणीसाठी आलेल्या विवाहित महिलेवर डॉक्टरने दवाखान्यातच केला बलात्कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.