आपल्या पहील्याच नोकरीच्या मुलाखतीला जाताना रतन टाटांनी केली होती ‘ही’ मोठी चूक

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण जेव्हा रतन टाटा यांना नोकरीची ऑफर आली होती तेव्हा त्यांच्याकडे रिझ्युम नव्हता. रतन टाटा यांनी स्वतः हा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, जेव्हा मी भारतात आलो तेव्हा मला IBM कडून नोकरीची ऑफर आली होती.

मी जेव्हा मुलाखीतला गेलो तेव्हा त्यांनी मला रिझ्युम मागितला पण माझ्याकडे रिझ्युम नव्हता. त्यांच्या ऑफिसमध्ये एक इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर होता मी तिथेच बसून लगेच रिझ्युम टाईप केला आणि त्यांना सुपूर्त केला.

टाटा आज भारतातले सगळ्यात प्रसिद्ध उद्योजकांमधील एक उद्योजक आहेत. ते त्यांच्या सॉफ्ट हार्टमुळेसुद्धा ओळखले जातात. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये कोरनेल युनिव्हर्सिटीतून त्यांनी आर्किटेक्चरची डिग्री घेतली आहे. तिथून भारतात आल्यानंतर त्यांनी लगेच टाटा ग्रुप जॉईन नव्हता केला.

त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमध्येच झाले होते. मधले काही दिवस त्यांनी अमेरिकेत घालवले. त्यांना आधी इंजिनिअरिंग करायचे होते पण ते नंतर उद्योग क्षेत्रात आले आणि आज ते जगातील एक नावाजलेले इंडस्ट्रीयलिस्ट आहेत.

त्यांना IBM मधून नोकरीची ऑफर आली होती आणि ते मुलाखतीलादेखील गेले होते पण त्यांनी IBM मध्ये नोकरी केली नाही. १९६२ मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजकडून नोकरीची ऑफर आली.

टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह, जमशेदपूर कंपनीमध्ये त्यांची ६ महिने ट्रेंनिग झाली. त्यानंतर ते टाटा स्टील कंपनीत गेले. तिथे ते लाईमस्टोन दगडांच्या सप्लायचे काम बघत होते. १९६९ मध्ये ते ऑस्ट्रेलियामध्ये टाटा ग्रुपचे रेजिडेंट रिप्रेझेंटेटिव्ह बनले. १९७० मध्ये ते पुन्हा भारतात आले आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसचे काम पाहू लागले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.