रतन टाटा आहेत ‘या’ गाड्यांचे शौकीन, बघा त्यांचे कार कलेक्शन

 

रतन टाटा भारताचे एक असे उद्योगपती आहे जे फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. ते सध्या टाटा गृपचे अध्यक्ष आहे. भारतात प्रतिष्ठीत उद्योगपतींनमध्ये त्यांचे नाव आहे, त्यांना त्यांच्या समाजसेवांच्या कामामुळे खास ओळख मिळाली आहे.

रतन टाटा यांना २००० मध्ये सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार म्हणजेच पद्म भुषण पुरस्कार देण्यात आला होता. तसेच २००८ मध्ये त्यांना पद्म विभुषण पुरस्कारही देण्यात आला आहे.

रतन टाटा यांची लाईफ स्टाईल अगदी सिम्पल असली तरी त्यांना विमान उडवण्याची आवड आहे. तसेच त्यांनी विमान उडवलेही आहे. तसेच त्यांना विविध गाड्यांची आवड आहे. चला तर मग जाणून घेऊया रतन टाट यांच्याकडे कोणकोणlत्या कार आहेत..

फेरारी कॅलिफोर्निया ही कार रतन टाटा यांच्या आवडत असलेल्या कारमधली एक कार आहे. टाटांना अनेकदा ही कार चालवताना बघण्यात आले आहे. सध्या फेरारीने हा मॉडेल बंद केला आहे.

रतन टाटा यांच्याकडे मर्सिडीज-बेंज एस-क्लास आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन ऑप्शनमध्ये आहे. ही कार 2996cc/v6 (s 450 varient), 2925 cc/L6 (s 350 d variant) आणि 3982 cc/v8 (s 63) या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.

रतन टाटा यांनी लँड रोवर ही कंपनी विकत घेतली आहे. पण या कंपनीचे मालक बनण्याआधीच त्यांच्याकडे लँड रोवर फ्रिलँडर होती. ते अनेकदा या कारमध्ये दिसून आली आहे. ही कार चार सिलेंडर डिझेल इंजिनची आहे. विशेष म्हणजे फ्रिलँडर शिवाय आजही त्यांच्या कार कलेक्शनमध्ये लँडरोवरची दुसरी कार नाही.

टाटा नेक्सॉन ही टाटा मोटर्सची सब-कॉम्पेक्ट एसयुव्ही कार आहे. ही कार ४-मीटरच्या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त विकली गेलेली कार आहे. रतन टाटा यांना निळ्या रंगाच्या नेक्सॉनमध्ये बघण्यात आले आहे.

रतन टाटा यांच्याकडे खुप वर्षांपासून टाटा इंडीगो मरीना आहे. तसेच रतन टाटांकडे याशिवाय वेगवेगळ्या गाड्या आहे. त्यात किसलर सेब्रिंग, मर्सिडीज-बेंज w124, कॅडीलेक XLR आणि मर्सिडीज बेंज 500 SL सारख्या कार रतन टाट यांच्याकडे आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.