रतन टाटांचा मेगा प्लॅन! एअर इंडिया पाठोपाठी ‘ही’ कंपनीही खरेदी करणार टाटा समुह

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी करोडोंच्या कर्जात बुडालेल्या सरकारी कंपनी एअर इंडियाला नुकतेच खरेदी केले आहे. त्यामुळे प्रक्रिया पुर्ण होऊन एअर इंडियाची कमान टाटा समुहाकडे डिसेंबरपर्यंत येईल, असे म्हटले जात आहे.

तसेच रतन टाटा आता एका मेगा प्लॅनवर काम करत असल्याचे म्हटले जात आहे. आताच्या घडीला टाटा समुहाकडे एअर एशिया, इंडिया आणि विस्तारा या कंपन्यांचा हिस्सा आहे. एअर एशियामध्ये टाटा समुहाचा तब्बल ८४ टक्के हिस्सा आहे.

आता टाटा समुह याच एअर एशियामधील आपला हिस्सा वाढवण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. टाटा समुह एअर एशिया इंडियामध्ये एअर इंडिय एक्सप्रेसचे विलीनीकरण करुन एकच कंपनी स्थापन करण्याच्या विचारात आहे.

टाटा समुहाकडे एअर एशिया इंडियाचा ८४ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे एअर इंडियाचे विलीनीकरण करुन एकच कंपनी स्थापन करण्याचा अधिकार टाटाला प्राप्त आहे. तसेच टाटाने विस्तारा आणि एअर इंडियाच्या योग्य आणि नियोजनबद्ध वेळापत्राकासाठी सिंगापूर एअरलाइन्ससोबत चर्चा सुरु केली असल्याचेही म्हटले जात आहेय.

टाटा समुहाकडे विस्टारा एअरलाइन्सची ५१ टक्के हिस्सेदारी आहे. तर उरलेली हिस्सेदारी सिंगापूर एअरलाइन्सकडे आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा समुहाला एअर एशिया आणि एअर इंडियाचे विलीणीकरण करणे अवघड जाणार नाही. यामुळे टाटा सन्सला एकाच कंपनीचे संचालन करावे लागेल. त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास, विस्तार करणे सुलभ होऊ शकणार आहे.

दरम्यान, आताच्या घडीला एअर इंडियावर ६१ हजार ५६२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ७५ टक्के कर्ज टाटा समुहाकडे हस्तांतरण करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या तिजोरीतून चुकते करण्यात येणार आहे. तर उर्वरित कर्ज टाटा समुह फेडणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: सुरक्षा रक्षकांना बगल देत मैदानात आला रोहित शर्माचा चाहता, डोकं टेकवून केला नमस्कार
बिग ब्रेकींग! काॅंग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांनी एकाचवेळी दिला राजीनामा; राजकारणात खळबळ
रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला, आपल्या खेळाडूंना स्वातंत्र्य देणं खुप गरजेचं कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.