रतन टाटा देखील ‘या’ २८ वर्षाच्या तरुणाकडून घेतात सल्ला, जाणून घ्या कारण…

मुंबई । भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे नाव देश पातळीवर नव्हे तर जगामध्ये आदराने घेतले जाते. त्याला तशी कारणे आहेत. देशाच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र हेच रतन टाटा कुठे गुंतवणूक करायची असेल तर एका तरुणाचा सल्ला घेतात. तुम्हाला हे खोटे वाटेल पण हे खरे आहे.

रतन टाटा आपली खासगी गुंतवणूक ज्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये करतात त्यांची निवड करताना ते या तरुणाचा सल्ला घेतात. शंतनू नायडू असे या तरुणाचे नाव आहे. मात्र हा शंतनू नायडू आहे तरी कोण याबाबत अनेकांना माहिती नाही. तो काय काम करतो, याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

या शंतनूची मोटोपॉज नावाची कंपनी आहे. जी कुत्र्यांच्या गळपट्ट्याच्या कॉलरचे डिझाइन तयार करते. हे पट्टे रात्री चमकतात. मोटोपॉजचा व्यवसाय अनेक देशांमधील विविध शहरात सुरू आहे. शंतनू म्हणाला, रस्त्यांवरील भरधाव वेगातील गाड्यांच्या खाली सापडून अनेक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना मी पाहिल्या आहेत.

वाहनाच्या ड्रायव्हरला कुत्रा रस्त्यामध्ये आल्याचे दिसत नाही. त्यामुळे मला कुत्र्यांसाठी कॉलर रिफ्लेक्टर तयार करण्याची कल्पना सुचली. त्याने मोटोपॉज नावाने कुत्र्यांसाठी कॉलर तयार केली. यामुळे अनेक भटक्या कुत्र्यांचे जीव वाचत आहेत. ही गोष्ट टाटांना कळाली.

टाटांशी झालेल्या भेटीत त्यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रकल्पात आर्थिक मदतीची तयारी दाखवली पण शांतनूने ती नाकारली. टाटांनी शंतनूच्या स्टार्टअपमध्ये काही रक्कम गुंतवली, त्यानिमित्ताने शंतनूची टाटांशी वारंवार भेट होऊ लागली. त्याचे काम टाटांना आवडले.

यानंतर ते दोघे अजूनच जवळ आले त्यांच्या अनेकदा भेटी झाल्या. टाटा देखील त्याचे म्हणणे ऐकून घेतात. उद्योगाबाबत चर्चा करत असतात. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर टाटांनी त्याला आपल्या ऑफिसात नोकरी करण्याचे आमंत्रण दिले.

ताज्या बातम्या

तुझे करिअर संपवल्याशिवाय शांत बसणार नाही! अभिनेत्याची सलमान खानला धमकी

काय सांगता! इस्राईलमध्ये सापडले 1000 वर्ष जुन्या कोंबडीचे अंडे, मात्र पुढे असं झालं की…

स्वत:च्या लग्नात नाचनारी ती नवरी म्हणतीय म्हणतीय तुझं नि माझं लफडं गावात गाजलं; पहा भन्नाट व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.