…आणि २८ वर्षीय शंतनूचे काम रतन टाटांना आवडले! आजही घेतात त्याचा सल्ला

मुंबई । रतन टाटा हे एक जगातील मोठे  उद्योगपती म्हणून ओळखले जातात. देशाच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र हेच रतन टाटा कुठे गुंतवणूक करायची असेल तर एका तरुणाचा सल्ला घेतात. तुम्हाला हे खोटे वाटेल पण हे खरे आहे.

रतन टाटा आपली खासगी गुंतवणूक ज्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये करतात त्यांची निवड करताना ते या तरुणाचा सल्ला घेतात. शंतनू नायडू असे या तरुणाचे नाव आहे. मात्र हा शंतनू नायडू आहे तरी कोण याबाबत अनेकांना माहिती नाही. तो काय काम करतो, याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

या शंतनूची मोटोपॉज नावाची कंपनी आहे. जी कुत्र्यांच्या गळपट्ट्याच्या कॉलरचे डिझाइन तयार करते. हे पट्टे रात्री चमकतात. मोटोपॉजचा व्यवसाय अनेक देशांमधील विविध शहरात सुरू आहे. शंतनू म्हणाला, रस्त्यांवरील भरधाव वेगातील गाड्यांच्या खाली सापडून अनेक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना मी पाहिल्या आहेत.

वाहनाच्या ड्रायव्हरला कुत्रा रस्त्यामध्ये आल्याचे दिसत नाही. त्यामुळे मला कुत्र्यांसाठी कॉलर रिफ्लेक्टर तयार करण्याची कल्पना सुचली. त्याने मोटोपॉज नावाने कुत्र्यांसाठी कॉलर तयार केली. यामुळे अनेक भटक्या कुत्र्यांचे जीव वाचत आहेत. ही गोष्ट टाटांना कळाली.

टाटांशी झालेल्या भेटीत त्यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रकल्पात आर्थिक मदतीची तयारी दाखवली पण शांतनूने ती नाकारली. टाटांनी शंतनूच्या स्टार्टअपमध्ये काही रक्कम गुंतवली, त्यानिमित्ताने शंतनूची टाटांशी वारंवार भेट होऊ लागली. त्याचे काम टाटांना आवडले.

यानंतर ते दोघे अजूनच जवळ आले त्यांच्या अनेकदा भेटी झाल्या. टाटा देखील त्याचे म्हणणे ऐकून घेतात. उद्योगाबाबत चर्चा करत असतात. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर टाटांनी त्याला आपल्या ऑफिसात नोकरी करण्याचे आमंत्रण दिले.

ताज्या बातम्या

‘तू चूकीच्या माणसाशी पंगा घेतला, तुझे करीअर संपवल्याशिवाय राहणार नाही’; सलमानला धमकी

‘शोले’ चित्रपटातील गब्बरचा लुक रमेश सिप्पीने नाही तर आमजद खानने केला होता डिझाइन

‘या’ इलेक्ट्रिक कार्स एकदा चार्ज केल्यावर धावतात ४०० किलोमीटरपेक्षा जास्त, वाचा फीचर्स आणि किंमत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.