सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती देखील वाढत आहेत. देशातील महागाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. सर्वसामान्य जनतेचे महिन्याचे गणित बिघडत चालले आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने काय नियोजन आखले आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने(NCP) केला आहे.(rashtrvadi congress statement pm modi)
तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईवर आतातरी माध्यमांशी बोलावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महेश तपासे यांनी महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
“देशात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. अच्छे दिन आणण्याचे स्वप्न जनतेला दाखवण्यात आलं. पण आज महागाईमुळे लोकांचे दरडोई उत्पन्न कमी झाले आहे. वाढती महागाई लपवण्यासाठी जातीय तणाव निर्माण करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, “रामनवमी आणि हनुमान जयंती दिवशी घडलेला हिंसाचार हा या षडयंत्राचाच भाग होता. केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जातीपातीचे आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे. देशात महागाई भयंकर वाढली आहे. सर्वसामान्य जनतेचे महिन्याचे गणित बिघडत चालले आहे.”
“देशातील महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काय नियोजन आखले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतातरी माध्यमांशी बोलावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. यावेळी महेश तपासे यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. सत्तर वर्षात झाली नाही इतकी महागाई भाजपने करून दाखवली आहे, असा खोचक टोला महेश तपासे यांनी लगावला आहे.
नुकतंच आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी देशातील धार्मिक वादासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. काही राजकीय पक्षांकडून देशात धार्मिक द्वेष पसरवला जात आहे. शरद पवारांनी याविरोधात आवाज उठवावा”, अशी मागणी त्या पत्रात करण्यात आली आहे. या पत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वागत केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
सोने-चांदीचा भाव गडगडला, दोन दिवसांत चांदी १७०० रुपयांनी झाली स्वस्त, तर सोने…
जहांगीरपुर हिंसाचारात अटक झालेला आरोपी निघाला करोडपती, तपासात झाले अनेक धक्कादायक खुलासे
गळ्यात सोन्याची साखळी, महागड्या गाड्यांचा छंद, जहांगीरपुरमध्ये गुंडागर्दी; वाचा मोहम्मद अन्सारीबद्दल..