पुणे: मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. मनसे(MNS) पक्षाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(rashtrvadi congress party give offer to vasant more)
या निर्णयानंतर नगरसेवक वसंत मोरे दुसऱ्या पक्षात जाणार का? या चर्चांना उधान आले आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण पुण्यात राष्ट्रवादी प्रबळ आहे. वसंत मोरेंना विधानसभेला तब्बल ३४ हजारांहून अधिक मते पडली होती. ते सतत १५ वर्षे नगरसेवक आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरेंना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले वसंत मोरेंचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत आहे. तसेच मनसेतून राष्ट्रवादीत गेलेल्या रूपाली ठोंबरे पाटील यांनीही मोरेंना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. पण नगरसेवक वसंत मोरे हे निमंत्रण स्विकारणार की धुडकावून लावणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर हजर होते. पण या बैठकीला वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती.
यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती मिळत होती. तसेच वसंत मोरेंनी मनसे पक्षाचा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप देखील सोडला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात वसंत मोरेंनी विधान केले होते.
“जर मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा”, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलं होतं. यावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षाच्या शाखेवर भोंगे लावले होते. पण राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे वसंत मोरे नाराज होते.
वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेला नकार दिला होता. यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, “मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाहीये. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही,” असं सांगितलं. याचबरोबर मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही”, असे त्यांनी सांगितले होते.
त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज होते. या नाराजीतूनच राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. आता वसंत मोरे यावर कोणतं पाऊल उचलणार? याची उत्सुकता जनतेला लागली आहे.
तसेच वसंत मोरेंनी साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी हटके फेसबूक पोस्ट करत नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले आहे. “आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड खुप खुप अभिनंदन साई” असे म्हणत वसंत मोरेंनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पण हे अभिनंदन वरवरचे आहे की मनापासूनचे हे आगामी काळात समजून येईल.
महत्वाच्या बातम्या :-
‘आरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे’; वसंत मोरेंनी केले नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन
मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदावरून वसंत मोरेंची उचलबांगडी, साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष; राज ठाकरेंची तडकाफडकी कारवाई
विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशाचं काय झालं? पत्रकारांनी प्रश्न विचारताच सोमय्यांनी काढला पळ