टफ फाइट! ‘आरजेडी’नं भाजपला ओव्हरटेक करत घेतली मुसंडी 

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात काय चित्र स्पष्ट होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. आता जे कल हाती येत आहेत त्यावरुन महाआघाडी आणि एनडीए यांच्यात चुरशीची लढाई दिसून येते आहे. बिहारची निवडणूक एनडीए आणि महाआघाडी प्रतिष्ठेची केली आहे.

याचबरोबर सायं ६ पर्यंत एनडीएने १२१ जागांवर आघाडी घेतली होती. तर महागठबंधन ११४ जागांपर्यंत पोहोचली होती.  मात्र आता हे चित्र थोडे वेगळे समोर येत आहे. नवीन कलांनुसार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील आरजेडीने भाजपला मागे टाकले आहे.

भाजपला ओव्हरटेक करत आरजेडीने ७५ जागांवर आघाडी घेत मोठा पक्ष म्हणून उभारी घेतली आहे. तर दुसरीकडे भाजप ७३ जागांसह दुसऱ्या क्रमाकांवर आहे. याचबरोबर बिहारमध्ये उशिरा रात्रीपर्यंत निकाल लागण्याची शक्यता असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

दरम्यान, साडेसहा वाजेपर्यंत ३ कोटीहून अधिक मतमोजणी झाली आहे. अजूनी १ कोटीहून अधिक मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे बहुमत कोणत्या पक्षाला मिळेल हे अजूनही सांगता येणं कठीण आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
तेजस्वी यादव यांची मेहनत तरूण राजकारण्यांसाठी खूप प्रेरणादायी – शरद पवार
Bihar election results: अमित शहांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोन करताच सूत्रे हालली आणि…
२६ वर्षांपर्यंत क्रिकेटर ते उपमुख्यमंत्री जाणून घ्या तेजस्वी यादव यांचा आतापर्यंतचा प्रवास….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.