राष्ट्रवादीच्या आमदाराने अयोध्येतील राममंदीरासाठी दिली तब्बल १० लाखांची देणगी

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीच्या निधी संकलनाला आता सुरुवात झाली आहे. राममंदिराच्या उभारणीसाठी सर्व स्थरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. विविध पक्षांची नेतेमंडळीही यामध्ये हिरीरीने सहभाग घेत असून मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेवके यांनीही राम मंदिरासाठी निधी दिला आहे.

श्रीराम मंदिर उभारणीसाठी सुनील शेळके यांनी शनिवारी दहा लाख रुपयांची देणगी दिली. या देणगीचा धनादेश त्यांनी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे जिल्हा संयोजक प्रदीप शामराव देसाई यांच्याकडे शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ येथे सुपूर्त केला.

मावळातील प्रत्येक नागरिकानेे या राममंदिर निर्मितीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शेळके यांनी यावेळी केले. तर मावळ तालुक्यातून एक कोटी रुपयांचा निधी या मंदिर उभारणीसाठी गोळा करण्याचा संकल्प सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला आहे. असेही शेळके यांनी सांगितले.

आमदार सुनिल शेळके यांनी फेसबुक वर ही माहिती दिली आहे. “आज संपूर्ण जगभरातून प्रत्येकजण अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. या पुण्य यज्ञात दहा लक्ष रुपये समर्पित करून मला सुद्धा या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले याचा अभिमान आहे.” असे ते म्हणाले.

सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करू पण…..; मध्य रेल्वेने दिली ही माहिती

फॅक्ट चेक: १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार?; केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

वरुण धवनची बायको आहे यशस्वी बिजनेस वूमन; जाणून घ्या नताशा दलालबद्दल काही रोचक गोष्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.