रश्मिका मंदानाने मारली पलटी, आधी म्हणाली विराट माझा फेवरेट, पण आता घेतलं दुसऱ्याचं नाव

नॅशनल क्रश असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना सतत चर्चेत असते. तिचे चित्रपट देखील सुपरहिट होतात. जगभरात तिचे चाहते आहेत. अगदी काही वर्षातच तिने आपली छाप पाडली आहे. साऊथच्या चित्रपटाबरोबरच आता तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत.

असे असताना आता मात्र ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिने यंदाच्या आयपीएलमध्ये आवडता खेळाडू म्हणून विराट कोहलीचे नाव सांगितले होते. आता मात्र तिने पलटी मारली आहे. यामुळे बंगळुरुचे चाहते नाराज झाले आहेत.

आता ती म्हणाली, महेंद्रसिंग धोनी माझा आवडता खेळाडू आहे. यामुळे rcb चा कर्णधार असलेल्या विराट कोहलीच्या चाहत्यांना देखील धक्काच बसला आहे. आयपीएलदरम्यान एका इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान तिने खुलासा केला होता. यामुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रश्मिका मंदनाच्या एका चाहत्याने, ‘तुझा आवडता आयपीएल संघ कोणता?’ असा प्रश्न विचारला. त्यावर अभिनेत्रीने क्षणाचाही विलंब न लावता, ‘ई साला कप नमदे’, असे उत्तर दिले होते. सुरुवातीला ते कोणालाच समजले नाही.

म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ यंदा आयपीएलमध्ये जिंकायला हवा, असे तिने म्हटले होते. ‘ई साला कप नमदे’ हा विराट कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या आरसीबी टीमचा नारा आहे. यामुळे तेव्हा आरसीबी चाहते आनंदी झाले होते.

एवढेच नाही तर रश्मिकाने हे उत्तर देताना हाताने हृदय देखील तयार केले होते. मात्र आता रश्मिकाने आरसीबीच्या चाहत्यांना धक्काच दिला आहे. यामुळे आता पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. रश्मिकाच्या प्रत्येक वक्तव्यावर तिचे चाहते लक्ष ठेवून असतात.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे देखील जगभरात चाहते आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे. आता रश्मिकाने धोनीचे नाव घेतल्याने धोनीचे चाहते आनंदात आहेत.

ताज्या बातम्या

जगातली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर, एकाच चार्जमध्ये धावते २४० किमी; किंमत फक्त..

‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेत्री आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या मुंबईतील आलिशान घराचे फोटो

…म्हणून माधूरीने व रवीनाने ‘हम साथ साथ है’ला दिला होता नकार; आजही करतात पश्चाताप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.