बाबो! रश्मिकाचा फॅन ९०० किलोमीटर प्रवास करुन आला तिला भेटायला, पण तिथं जाऊन भलतंच घडलं

तेलुगु चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रश्मिकाशी फॅम फॉलोविंग पण खुप जबरदस्त असून तिला नॅशनल क्रशही म्हटले जाते.

रश्मिकामुळे साऊथचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहे. आता ती बॉलिवूडमध्ये दिसून येणार आहे. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रश्मिका आता तिच्या चाहत्यामुळे चर्चेत आली आहे.

रश्मिकाचा एक चाहता तिला भेटण्यासाठी तेलंगाणातून कर्नाटकच्या कोडागु हा ९०० किलोमीटरचा प्रवास करुन आला होता. पण पोलिसांमुळे त्याला रश्मिकाला भेटता आले नाही आणि त्याला तसेच परतावे लागले आहे.

तेलंगाणामध्ये राहणाऱ्या या फॅनचे नाव आकाश त्रिपाठी असे आहे. गुगल सर्चच्या मदतीने तो रश्मिका मंदानाच्या घरी पोहचला. त्यासाठी त्याने मैसुरला जाण्यासाठी रेल्वे पकडली. त्यानंतर कोडागु जिल्ह्यात पोहचण्यासाठी त्याने एक माल वाहतूक गाडीमध्ये प्रवास केला.

पुर्ण रस्त्यात तो रश्मिकाच्या घराचा पत्ता विचारत राहिला. त्यानंतर पोलिसांना त्या तरुणावर शंका आल्याने त्यांनी त्याला पकडले. पोलिसांनी त्याला तातडीने तेलंगाणा परत जाण्यास सांगितले, कारण कोडागु शहरात लॉकडाऊन आहे.

त्यानंतर आकाशला कळाले की रश्मिका एका शुटींगमुळे मुंबईत आहे. त्यामुळे आकाश खुप निराश झाला आणि तो पुन्हा आपल्या गावी परत निघून गेला. हा फॅन चक्क ९०० किलोमीटर प्रवास करुन आल्याने रश्मिकासोबतच हा फॅनसुद्धा चर्चत आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच रश्मिका मंदाना मुंबईला आली आहे. काही दिवसांपुर्वी ती तिच्या पाळीव कुत्र्यासोबत दिसून आली होती. रश्मिका लवकरच हिंदी चित्रपटात दिसून येणार आहे. तिचा सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू हा चित्रपट येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: नितीन गडकरींचा ताफा पुढे जाताच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकारी अन् एसपींमध्ये हाणामारी
संजय दत्तच्या या गर्लफ्रेंडला वैतागले होते सुनील दत्त; ब्रेकअप करण्याचे दिले आदेश
VIDEO: रियल हिरो सोनू सूद करतोय साकलवरून ब्रेड, अंड्यांची होम डिलिव्हरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.