“भाजप बरोबर राहण्यासाठी पोलिस अधिकारी रश्मी शुक्लांनी ‘या’ आमदाराला धमकावलं”

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु आहे. काल कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडताना अनेक महत्वाच्या मुद्यांवर लक्ष वेधले होते.

आता त्यांनी, अपक्ष आमदारांना महाविकास आघाडीपासून दूर करण्याचा प्रयत्न रश्मी शुक्ला यांनी केला होता, असा गौप्यस्फोट केल्याने आरोप करणार्‍या भाजपचीच कोंडी होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ट्वीट करत आव्हाड म्हणतात, ‘शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती.’

दरम्यान, ‘रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

…तेव्हा रश्मी शुक्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रडल्या
‘रश्मी शुक्ला यांना जेव्हा फोन टॅपिंगच्या पत्राविषयी समजलं तेव्हा आपण पकडलो गेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रडल्या. त्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे गेल्या तेथेही त्या रडल्या. त्यांनी माफी मागत कारवाई करु नये, असेही आव्हाड यांनी म्हंटले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”

मोदी सरकारच्या ‘या’ भन्नाट योजनेमुळे हा तरुण झाला मालामाल, महिन्याला कमवतोय लाखो रुपये

नाद खुळा! सरकारी नोकरी सोडून सुरु केली ही शेती आता महिन्याला कमवतोय लाखो रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.