रश्मी शुक्लांनी भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव आणला; राजेंद्र पाटील यड्रावकरांचा खुलासा

मुंबई | पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर लागलेल्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. रश्मी शुक्ला यांनी भाजपाला मदत करावी यासाठी प्रयत्न केला होता. त्यांचा मला फोन आला होता अशी कबुली आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.

गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अपक्ष आमदारांना महाविकास आघाडीपासून दूर करण्याचा प्रयत्न रश्मी शुक्ला यांनी केला असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या आरोपानंतर भाजपची कोंडी झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपानंतर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना प्रसारमाध्यमांनी रश्मी शुक्ला यांच्या कथीत फोनबाबत विचारले. यावेळी यड्रावकर यांनी संगितले की, होय भाजपमध्ये जाण्यासाठी मला पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा फोन आला होता.

तसेच यड्रावकर पुढे म्हणाले, मी त्यांना संगितले की, मी अपक्ष आमदार आहे. त्यामुळे मला कोणताही निर्णय घेण्यापुर्वी माझ्या मतदरसंघातील जनतेला विचारावे लागेल. असे मी रश्मी शुक्ला यांना सांगितले.

दरम्यान, शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. तसेच त्यांनी राजेंद्र पाटील यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. असे आरोप जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर केले आहेत.

रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला होता. तर २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर युतीचे बिनसले. तेव्हा भाजपला अपक्ष आमदारांची गरज भासू लागली. त्यावेळी भाजपने अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले. या काळातच रश्मी शुक्ला यांनी यड्रावकर यांना फोन केला असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
माजी पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आरोप केलेले ते बंटी बबली म्हणजे फडणवीस आणि रश्मी शुक्ला?
“भाजप बरोबर राहण्यासाठी पोलिस अधिकारी रश्मी शुक्लांनी ‘या’ आमदाराला धमकावलं”
“महाराष्ट्रात सरकार बनत असताना रश्मी शुक्लांनी नेत्यांचे फोन टॅप केले, त्या भाजपच्या एजंट”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.