Homeताज्या बातम्यारश्मी देसाईने नंदिश संधूसोबतच्या घटस्फोटाबद्दल ढसाढसा रडत केला धक्क्कादायक खुलासा; म्हणाली, 'आजही...

रश्मी देसाईने नंदिश संधूसोबतच्या घटस्फोटाबद्दल ढसाढसा रडत केला धक्क्कादायक खुलासा; म्हणाली, ‘आजही वेदना होतात’

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री ‘रश्मी देसाई’च्या प्रोफेशनल लाईफबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तिचं वैयक्तिक आयुष्य लोकांसमोर पूर्णपणे खुलून गेलं आहे. मग ते तिचे पहिले लग्न असो, नंदिश संधूसोबतचा घटस्फोट असो किंवा अरहान खानसोबतचे नाते आणि ब्रेकअप असो. तिचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

आता तिचा अजून एक कमकुवत पैलू बिग बॉस १५ च्या लेटेस्ट भागात दिसला, जिथे ती तिच्या पहिल्या लग्नाबद्दल भावूक झालेली दिसली. आजही ती विचार करून घाबरते, असा खुलासा तिने केला.

तुम्हाला आठवत असेल की जेव्हा रश्मी ‘बिग बॉस १३’ मध्ये दिसली होती, तेव्हा तिचा बॉयफ्रेंड अरहान खाननेही घरात एन्ट्री घेतली होती. पण रश्मीच्या आयुष्यात भूकंप आला जेव्हा होस्ट सलमान खानने तिला सांगितले की अरहान आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मूल आहे. हे ऐकून रश्मीचं काय प्रेक्षकांनाही धक्का बसला. यानंतर रश्मीने अरहानसोबतचे नाते संपवले.

View this post on Instagram

A post shared by Rashami Desai Wonderland (@rashamidesai_wonderland)

आता बिग बॉस १५ मध्ये रश्मी आणि नंदिश संधू यांच्याबद्दल चर्चा झाली आहे. वास्तविक, राखी सावंतने रश्मीला नंदिशसोबत घटस्फोट घेण्याचे कारण विचारले. सुरुवातीला रश्मी काहीही बोलण्यास नकार देते, पण नंतर ती म्हणाली की तिला याबद्दल बोलायचे नाही. समोरच्या व्यक्तीच्या (नंदिश) आयुष्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून ती याबद्दल बोलण्यावर विश्वास ठेवत नाही.

अभिनेत्री पुढे म्हणाली की, आम्ही दोघेही चांगल्या ठिकाणी आहोत आणि दोघांपैकी कोणासाठीही गोष्टी विस्कळीत व्हाव्यात अशी तिची इच्छा नाही. ती पुढे म्हणते, अशा कोणत्याही गोष्टीबद्दल बोलणे योग्य नाही कि ज्यामुळे त्याच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकेल. ती म्हणाली, ‘माझ्या बोलण्याने कोणी दुखावत असेल तर मी ते करत नाही.’

राखी सावंतसोबतच्या या संवादानंतर रश्मी देसाई गार्डन एरियातील तलावाजवळ रडताना दिसली. दरम्यान, राखी रश्मीवर खूप चिडलेली दिसत होती. अभिजित बिचुकले आणि उमर रियाझ यांच्यावरही तिने नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली की रश्मी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील जुन्या गोष्टींबद्दल बोलण्यास उत्सुक असते, परंतु तिने स्वतःबद्दल काहीही उघड केले नाही. दरम्यान उमर रियाज निघून जातो तेव्हा राखी म्हणते, ‘शहाणी ये ती, दीड शहाणी.’

दुसरीकडे, उमर रश्मीकडे तिचे सांत्वन करण्यासाठी जातो. तो तिला विचारतो की ती का रडली आणि अशा परिस्थितीला शांतपणे आणि मॅट्यूरिटीने हाताळण्यास सांगते. तेव्हाच रश्मीने खुलासा केला की तिच्या लग्नाचा आणि नंदिशचा विषय अजूनही तिला अस्वस्थ करतो. जेव्हा त्याच्याशी संबंधित काही येते तेव्हा ती तिचा तोल गमावते आणि एक विचार तिला घाबरवतो.

रश्मी म्हणते, ‘ती एक गोष्ट आहे जी मला नेहमीच त्रास देते. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी विसरले होते, कोणीतरी मला आठवण करून दिल्यावर मी जरा घाबरत होते. तिने हा ही खुलासा केला कि ती उमरलाही घाबरते. ती म्हणते, ‘मग मला तुझी भीती वाटायला लागते. का माहीत नाही.’ उमर रश्मीला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की तिने शोमध्ये तिच्या निवडीबद्दल कबुली दिली आहे, बाकी बाहेर गेल्यावर बघता येईल.

ताज्या बातम्या