जंगलात मिळाली सगळ्यात दुर्मिळ मांजर, एक डोळा निळा तर एक पिवळा; किंमत वाचून अवाक व्हाल

निसर्गात असे काही प्राणी आहेत की जे खुप दुर्मिळ आहेत. म्हणजे त्या प्रजातीच्या प्राण्यांची संख्या खुप कमी उरली आहे. भारतातसुद्धा अनेक दुर्मिळ प्राणी आहेत. मध्यप्रदेशमध्ये बैतुल येथे एका दुर्मिळ प्रजातीची मांजर आढळल्यामुळे सगळ्यांना कुतूहल वाटत आहे.

अनेक लोक या मांजरीला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या मांजरीमध्ये असे काय खास आहे? मांजर तर सगळीकडे आढळते पण ही मांजर वेगळी आहे. या मांजरीचे वैशिष्ट्य आहे तिचे डोळे. कारण तिचा एक डोळा निळा आहे आणि एक सोनेरी आहे.

या सुंदर मांजरीने एका कुटुंबाला भुरळ घातली आणि त्या कुटुंबाने त्या मांजरीला घरी आणले. ती मांजर आता त्या कुटुंबाची सदस्य बनली आहे. ही घटना बैतुलच्या सारणीचे आहे. या ठिकाणी राहणारे अनुभव सिंह दोन महिन्यांपुर्वी भोपाळहून सारणीकडे येत होते.

सारणीकडे येत असताना ते एका जंगलामध्ये थांबले होते. त्यांनी तिथे पाहिले की एक मांजर झाडावर चढलेले होते आणि त्या मांजराला एका कुत्र्याने झाडाखाली घेरले होते. त्यांनी त्या मांजरीचा जीव वाचवला आणि ते त्या मांजरीला घेऊन घरी आले.

घरी आल्यावर त्यांनी पाहिले की या मांजरीचा एक डोळा निळा आहे आणि एक डोळा सोनेरी आहे. या मांजरीला पाहून कुटुंबातील इतर सदस्य खुश झाले आणि त्यांनी त्या मांजरीला पाळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्या मांजरीचे नाव हैजर ठेवले आहे.

जेव्हा अनुभव यांनी मांजरीबद्दल इंटरनेटवर माहिती वाचली तेव्हा त्यांना कळले की ही खुप दुर्मिळ मांजर आहे. भारतात या मांजरीचे आस्तित्व नाहीत जमा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत हजारो डॉलरमध्ये आहे.

भारतीय चलनानुसार तिची किंमत पाच ते सात लाख रूपये आहे. ही मांजर त्यांना भेटल्यामुळे ते स्वत:ला भाग्यवान समजू लागले आहेत. या मांजरीला खाओ मनी कॅट म्हणतात. ही मांजर सहसा थायलंडमध्ये आढळते. ही मांजर खुप हुशार आणि चंचल असते.

या मांजरीची प्रजाती वाढवण्यासाठी विशेष ब्रीडींग केले जात आहे. तिच्या डोळ्यांच्या आयरिसची रचना वेगळी असल्यामुळे तिचे डोळे वेगवेगळ्या रंगाचे असतात. हे वैशिष्ट्य जन्मजात असतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.