परशुराम जयंतीनिमित्त जालन्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर ब्राम्हण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Ravsaheb Danve) यांनी केलं आहे.(Raosaheb Danve’s statement about bramhan chief minister)
यावेळी कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, “जातीपातीचे लोण राजकारणात आता मोठ्या प्रमाणात आले आहे. हे वास्तव नाकारून आता चालणार नाही. जात एकसंघ असली पाहिजे, तसे पूर्ण समाजाला एकत्र ठेवणारा नेता असावा. तसे नेतृत्व आपण निर्माण केले पाहिजे”, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, “ब्राम्हण समाज सर्व समाजाला दिशा देणारा आहे. केवळ नगरसेवक, नगराध्यक्ष या पदांवर काम करणाऱ्या ब्राम्हण समाजाला आता आपण पाहू नये. अशा एवढ्या छोट्या अपेक्षा व्यक्त करू नका. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर ब्राम्हण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत”, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमात उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील किनगावकर यांनी ब्राम्हण समाजाच्या उमेदवारांना नगर परिषदेच्या निवडणुकीत तिकीट द्यावे, अशी मागणी रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. त्यावर उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील ब्राम्हण समाजातील आहेत. यापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. ते देखील ब्राम्हण समाजातील होते. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी ब्राम्हण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करू म्हणण्याची भानगड सोडून द्यावी”, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
परशुराम जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे दीपप्रज्वलन केले. या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, डॉ. संजय राख, भाजप पक्षाचे नेते भास्कर दानवे देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
लहानपणी क्रिकेट खेळण्यावरून मारायचे वडील, आता IPL मधून कमावले करोडो रुपये, वाचा यशोगाथा
मनसे मशिदींवरील भोंग्यांवर आक्रमक असताना वसंत मोरेंचे स्टेटस चर्चेत; म्हणाले, आपण चुकीच्या दिशेने
VIDEO: सलमानच्या ईद पार्टीत दिसली कंगना; नेटकरी संतापले, ‘सरड्याचा रंग बदलत आहे’