आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “मी एका ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी नक्की प्रयत्न करेल” असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
अनेक विरोधी पक्षनेत्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील समावेश आहे. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आज पत्रकारांशी बोलताना, “तृतीयपंथीही मुख्यमंत्री होऊ शकतात” अशा शब्दात दानवेंना अजित पवारांनी सुनावले आहे.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना, “राज्यात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणणे योग्य नाही. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतात. यात काहीच हरकत नाही. मात्र जे कोणी १४५ चा बहुमताचा आकडा जमवू शकतील त्यांचाच व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसेल” असे अजित पवार यांनी म्हणले आहे.
दरम्यान परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना, “मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. या देशाला दिशा देण्याचे काम सर्व ब्राह्मण समाजानं केलं” असे रावसाहेब दानवे यांनी म्हणले होते.
यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर टीका करताना, “सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच असल्याचे सांगून नवीन करण्याच्या भानगडी सोडून द्या” असा टोला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी लगावला आहे. सध्या राजकीय वर्तुळात मशिदींवरील भोंग्यांचा वाद सुरू आहे. अशातच रावसाहेब दानवे यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.
महत्वाच्या बातम्या
“बाबरी पाडताना देवेंद्र फडणवीस तेथे हजर होते, याला मी साक्षीदार आहे”
अवघ्या २२ व्या वर्षी हजारो कोटींची कंपनी उभी केली; पुण्याची आर्या तावरे झळकली फोर्ब्जच्या यादीत
राष्ट्रवादीच्या महीला प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ महीला नेत्याची निवड; चर्चेतील नावांपेक्षा वेगळ्या नेत्याला संधी
ज्या मुलासाठी आर. माधवनने देश सोडला, तोच आता म्हणतोय, मला त्यांचा मुलगा म्हणून रहायचं नव्हतं..