..तेव्हा शिवसेनेला मराठा आरक्षणात रस नव्हता; रावसाहेब दानवेंचा गंभीर आरोप

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील वातावरण चांगलचे पेटले आहे. मराठा आरक्षणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी उडी घेतली आहे.

याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, ‘भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेनेने मराठा आरक्षणात केव्हाच रस दाखवला नाही. किंबहुना ते अनेक वेळा बैठकीला आलेच नाही,’ अशी टीका दानवे यांनी केली आहे.

तसेच याबाबत पुढे बोलताना दानवे यांनी थेट महाविकास आघाडीवर शाब्दिक निशाणा साधला आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकासआघाडी सरकार सपशेल अपयशी ठरली असल्याची घणाघाती टीका दानवे यांनी केली आहे.

याचबरोबर ‘मी राजकारण करत नाही, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच,’ अशी भावना भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे.

दरम्यान, सध्या लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवले असते. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावे इतकच माझं म्हणणे आहे. प्रत्येकाला न्याय देण्याची भावना असली पाहिजे. अन्यथा राजेशाही आणा, मग दाखवतो, काय करायचे अन् काय नाही असेही उदयनराजेंनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

सुशांतची ‘ही’ मॅनेजर होती रियाची खास मैत्रीण..धागे जुळायला लागले

आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने खळबळ; पोलिसांनी तीन जणांना घेतले ताब्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.