रणविर शौरीनं गाण्यातून साधला रिहानावर निशाणा; ‘रिहाना तो बहाना है..पप्पू को PM बनाना है’

मुंबई | दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया येत आहेत. अलीकडेच पॉप स्टार रिहानाने आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं. त्यानंतर अनेक जागतिक सेलिब्रिटींनी या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली होती.

याचाच धागा पकडत आता बाॅलीवूड अभिनेता रणविर शौरी यानं या प्रकरणावर एक गाणं तयार केले आहे. त्यामध्ये ग्रेटा थनबर्ग, रिहाना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य लोकांचाही उल्लेख करण्यात आला आहे. ‘रिहाना तो बहाना, किसानों के कंधे से बंदूक चलाना है। ग्रेटा तो अनपढ़ है, मोदी को शर्मिंदा करके पप्पू को पीएम बनाना है’ असं या गाण्याचे बोल आहेत.

रणविर शौरीनं गुरूवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. अनेकांनी त्याचा हा व्हिडीओ पसंत गेला आहे. लाखो युझर्सनं आतापर्यंत त्याचं हे गाणं पाहिलं देखील आहे.

दरम्यान, रिहानाने शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचे लक्ष वेधले आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचे ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असे तिने लिहले आहे.

तसेच पुढे रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देखील देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘ठाकरे सरकारला देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का?’
तुला पाहते रे…! अभिज्ञा भावेचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ; पहा व्हिडीओ
देशात ‘टिकैत फॉर्मूला’ लागू करा; शेतकरी नेत्याच्या ‘या’ मागणीने मोदी सरकारला फुटला घाम..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.