दिलदार हिरो! आजीबाईंची हाक ऐकून रणवीर सिंगने लेम्बोर्गिनी थांबवून घेतली भेट, पहा व्हिडीओ

रणवीर सिंग नेहमी त्याच्या कपड्यांमुळ चर्चेत असतो. त्याचा अंदाजावर अनेकजण फिदा आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये खुप नाव कमावले आहे. तो सोशल मिडीयावरही नेहमी ऍक्टीव्ह असतो.

पण सध्या रणवीर सिंग एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कारण तो त्याच्या चाहत्या असलेल्या आजींना भेटला आहे. त्याने प्रेमाने त्या आजीबाईंची विचारपूस केली आहे. हा किस्सा मंगळवारचा आहे.

रणवीर सिंग त्याच्या पिवळ्या रंगाच्या लेम्बोर्गिनीतून फिल्म डबिंगसाठी स्टुडीओत चालला होता. गाडीही तो स्वता चालवत होता. त्याची वाट पाहत फोटोग्राफर्स त्याच्या काम संपण्याची वाट पाहत होते.

त्याने बाहेर आल्यानंतर फोटोग्राफर्सला मस्त पोज दिल्या. याचदरम्यान त्याला जाणवले की त्याला मागून कोणीतरी आवाज देत आहे. त्याने मागे वळून पाहिले की एक आजी त्याला आवाज देत आहेत. या आजी रणवीरच्या खुप मोठ्या चाहत्या आहेत त्यामुळे त्या त्याला खिडकीतून आवाज देत होत्या.

आवाज ऐकून रणवीर लगेच खिडकीकडे धावला. या आजींशी रणवीरने काही काळ खिडकाबाहेर उभे राहून गप्पा मारल्या आणि जाताना त्याने आजींचा निरोप घेताना त्यांच्या हाताचे चुंबनही घेतले आणि त्यांचा आशिर्वादही घेतला. या भेटीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहेत. त्यानंतर रणवीरवर सगळीकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या
रणबीर कपूरच्या ‘त्या’ एका वाईट सवयीला वैतागली आहे फिल्म इंडस्ट्री; अनूष्का शर्माने केला खुलासा
विरोधकांपुढे ठाकरे सरकार नमले, सचिन वाझेंबाबत गृहमत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
आजकाल कुठे गायब आहे ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील बालकलाकार दर्शिल सफारी?
अटकेनंतर कुख्यात गुंड गजा मारणेनं चक्क पोलिसांना ठोकला ‘सलाम’, वाचा काय आहे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.