एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री होती रणवीर सिंगची आजी; पहा फोटो

रणवीर सिंगने त्याच्या वेगळ्या स्वभावाने बॉलीवूडमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. २००८ मध्ये रिलीज झालेल्या बॅंड बाजा बारात चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. पहील्या चित्रपटानंतर रणवीरने त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये काहीतरी वेगळे केले आहे. ज्यामूळे तो खुप प्रसिद्ध झाला.

पद्मावत असो किंवा गल्ली बॉय रणवीर सिंगने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान बनवले. आजच्या घडीला तो फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागडा अभिनेता आहे. ज्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर ही जागा मिळवली आहे.

रणवीर सिंगचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. त्याचे फॅन्स भारतासोबतच जगभरात पसरले आहेत. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचे बारकाईने लक्ष असते. त्याची प्रत्येक गोष्ट चाहत्यांना माहीती असते. पण एक गोष्ट अशी आहे जी खुप कमी लोकांना माहीती आहे. ती म्हणजे त्याच्या आजीबद्दल.

खुप कमी लोकांना माहीती आहे की, रणवीर सिंगची आजी चांद बर्क बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. चांद बर्कचा जन्म २ फेब्रूवारी १९३२ ला पाकिस्तानच्या झुमरामध्ये झाला होता. त्यांचे कुटूंब खुप मोठे होते.

त्यामूळे चांद बर्क यांनी वयाच्या चौदाव्या वर्षा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. १९४६ मध्ये त्यांनी पंजाबी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अनेक पंजाबी चित्रपट केले. अभिनयासोबतच त्या खुप उत्तम डान्स देखील करायच्या. म्हणून त्यांना द डान्सिंग लिली ऑफ पंजाब बोलले जायचे.

चांद बर्क यांनी राज कपूरमूळे बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यामूळे त्या त्यांच्या फिल्मी करिअरसाठी राज कपूरला धन्यवाद द्यायच्या. राज कपूरने बुट पॉलिश चित्रपटातून चांद बर्कला बॉलीवूडमध्ये लॉन्च केले होते. त्यानंतर त्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री बनल्या.

१९५७ मध्ये चांद बर्कने सुंदर सिंह भवनानीसोबत लग्न केले. सुंदर सिंह प्रसिद्ध बिजनेस मॅन होते. चांद बर्कला दोन मुलं झाले. मुलगी टोनिया आणि मुलगा जगजीत सिंह भवनानी. जगजीत सिंह रणवीर सिंगचे वडील आहेत. त्यांनी फिल्मी दुनियेपासून दुर बिजनेसमध्ये नाव कमवले.

५० आणि ६० च्या दशकातील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये चांद बर्कने काम केले होते. पण त्यांना हवी तशी ओळख मिळू शकली नाही. २००८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज रणवीर सिंग त्याच्या आजीची अभिनयाची परंपरा पुढे नेत आहे.

महत्वाच्या बातम्या –
अर्जुन कपूरने सांगितले आई वडिलांच्या घटस्फोटाचे दुःख; म्हणाला, सोळाव्या वर्षी १५० वजन झाले
अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज, हॉटस्टार बरोबर पण केलाय सौदा पक्का
धर्मेद्र व हेमा मालिनी यांच्या नात्यात दुरावा? ‘या’ कारणामुळे वर्षभरापासून राहताहेत वेगळे

बॉलीवूडमध्ये बापासोबतही रोमान्स करताना मागे नाही हटल्या या प्रसिद्ध अभिनेत्री, एकीने तर..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.