एका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडलची आज काय अवस्था झाली बघा, वाचून धक्का बसेल

लॉकडाऊनच्या काही काळ आधी एका बाईचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यात ती गाणे गात होती. तो व्हीडिओ इतका व्हायरल झाला की, त्या बाईचे आयुष्य बदलून गेले. ती बाई रातोरात लोकप्रिय झाली. ती होती रानू मंडल. पण आज रानू मंडलची अवस्था पाहून तुम्हाला धक्का बसेल.

रानू मंडलचे बदललेले दिवस आता पुन्हा जसे होते तसेच झाले आहेत. आता पै पै जमण्यासाठी तिला धडपड करावी लागत आहे. घर चालवण्यासाठी तिच्याकडे आता पैसेही उरलेले नाहीत. परिस्थिती बदलल्यामुळे रानू मंडल नवीन घरात राहायला गेली होती.

आता पुन्हा परिस्थिती बिकट झाल्यामुळे जुन्या घरात राहायला आली आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पहिल्यांदा रानू मंडलला लोकांनी डोक्यावर घेतले होते पण तिच्या उद्धटपणाचे व्हीडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हापासून दिवस बदलले.

लोकांनी रानू मांडलचा खुप द्वेष केला. जसे लॉकडाऊन झाले तसे रानू मंडलक्सचे आयुष्य पूर्ण बदलून गेले आहे. फेब्रुवारीमध्ये रानू मंडलने आपले नवीन घर सोडले आणि जुन्या घरी राहायला आली. एक काळ असा होता की, स्वतः सलमान खानदेखील रानू मंडलची गाणी ऐकत होता. त्याने स्वतः एक व्हिडिओ जारी केला होता.

पण आता दिवस बदलले आहेत. एका न्यूज नेटवर्कने रानू मंडलचे लॉकडाऊनमधले फोटो जारी केले आहेत. त्यात ती गरीब लोकांना मदत करताना दिसत होती. काही गरीब लोकांना ती आपल्या घरी घेऊन गेली होती. असहाय्य लोकांना तिने गरजेचे समान विकत घेऊन दिले. ज्यात तांदूळ, डाळ, अंडी यांचा समावेश होता.

लॉकडाऊन इतक्या दिवस चालेल याचा रानुला काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे आता परिस्थिती बिकट झाली आहे. असे दिसत आहे की, चाहत्यांसोबत उद्धटपणे वागणे चांगलेच भवले आहे. तिची लोकप्रियता इतकी वाढली होती की, तिला बघायला लोकांची गर्दी होत होती.

रानू मंडलला हे सर्व हाताळता आले नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन आणि पत्रकारांना उलट उत्तरे देणे यामुळे रानू मंडलची लोकप्रियता कमी झाली. आणि तिचे जुने दिवस परत आले. रानू मंडलची मुलगी एलिझाबेथ हिने सांगितले आहे की, आईचा एटिट्युड तिला नेहमी भवतो. पण तिने जीवनात अनेक आडचणींचा सामना केला आहे.

हिमेश रेशमियाने जेव्हा रानू मंडलचा व्हायरल झालेला व्हीडिओ पहिला होता तेव्हा त्याच्या चित्रपटात त्याने रानू मंडलला गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर रानू रातोरात स्टार झाली होती. एका चॅनेलने रानू मंडलला सेलिब्रिटींच्या यादीत समाविष्ट करून घेतले होते.

या कार्यक्रमात अमिताभ बच्चनदेखील उपस्थित राहणार होते. मागील वर्षी ३१ डिसेंबरला हा कार्यक्रम होणार होता. पण रानू मंडलच्या गैरवर्तनाचे प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी रानू मंडलचे नाव यादीतून काढून टाकले. आज पुन्हा रानू मंडल जिथून सुरवात केली होती त्याच ठिकाणी येऊन पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या-
पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येनंतर वर्षभराने अभिनेत्री मयुरी देशमुखने सोडले मौन; म्हणाली…
साखरपुडा झाला, शिदोरी झाली, नवरदेव म्हणाला मुलगी पसंत नाय; मग काय जाम चोपला 
स्वत:च्याच लग्नात नवरी वाजवू लागली बेंजो, तुफान डान्सही केला; व्हिडीओ पाहून तुम्हीही नाचाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.