राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राची मुलगी आदिरा आहे बॉलीवूडची सर्वात श्रीमंत स्टार किड; बर्थडेला गिफ्ट मिळाला बंगला

बॉलीवूड कलाकार मिडीयामध्ये चर्चेचा विषय बनून राहण्यासाठी काहीही करायला तयार असतात. कलाकार मिडीया आणि लाईमलाईटपासून दुर राहणे अशक्य असते. पण तरीही काही कलाकार असे आहेत ज्यांना लाईमलाईटपासून दुर राहायला आवडते. ते त्यांच्या वैयक्तिक आयूष्याची कोणतीही मिडीयामध्ये येऊ देत नाहीत.

असाच काही स्वभाव आदित्य चोप्राचा आणि राणी मुखर्जीचा आहे. बॉलीवूडच्या मोठ्या निर्मात्यांमध्ये आदित्य चोप्राचे नाव येते. तर राणी देखील बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री होती. दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल खुप कमी गोष्टी मिडीयासमोर येऊ देतात.

आदित्य चोप्रा तर स्वत कॅमेऱ्यापासूनही दुर राहतात. त्यांच्या खुप कमी फोटो सोशल मिडीयावर उपलब्ध आहेत. आदित्य चोप्रासोबत लग्न केल्यापासून राणी मुखर्जी देखील लाईमलाईटपासून दुर राहते. राणी सोशल मिडीयावर देखील खुप कमी प्रमाणात सक्रिय असते.

आई झाल्यानंतर राणीने तिचा सगळा वेळ मुलगी आदिराचा सांभाळ करण्यासाठी दिला आहे. राणी आणि आदित्यचे फॅन्स नेहमी त्या दोघांबद्दल माहीती जाणून घेण्यात रुची ठेवतात. पण हे कपल मिडीयापासून दुर राहणे पसंत करते.

राणी मुलर्खी चित्रपटांपासून दुर असली तरी तिच्याकडे पैशांची कमी नाही. एकेकाळी टॉपची अभिनेत्री असणारी राणी मुखर्जी ९० करोडच्या संपत्तीची मालकिण आहे. तर आदित्य चोप्रा देखील करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यामूळे राणी खुप स्टाईलिश आयूष्य जगते.

राणी सगळ्या मोठ्या ब्रॅन्डच्या गोष्टींचा वापर करते. त्यामूळे अनेक वेळा राणीला खुप महागड्या कपड्यांमध्ये पाहीले जाते. त्यासोबतच राणी महागड्या गाड्यांची शौकीन आहे. म्हणून तिच्याकडे एक नाही तर अनेक करोडोंमध्ये किंमत असणाऱ्या गाड्या आहेत.

आदित्य चोप्राच्या संपत्तीचा आकडा सांगणे कठिण आहे. पण त्यांची संपत्ती देखील ३०० करोड पेक्षा अधिक आहे. आदित्यने मुलगी आदिराला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी दोन बंगले गिफ्ट केले होते. यावरुनच त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावला जाऊ शकतो.

आदित्यने आदिराला गिफ्ट केलेले हे दोन्ही बंगले मुंबईतील सर्वात पॉश भागात आहेत. ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. त्यांनी मुलगी आदिरासाठी सगळ्या सोयी सुविधा केल्या आहेत. त्यामूळे पुढे जाऊन आदिरा इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत स्टार किड बनू शकते.
महत्वाच्या बातम्या –
कॉमेडी क्विन भारती सिंहची झाली फजिती; पहा व्हिडिओ
मुलींचे जीन्स घालणे धर्मेंद्रला नव्हते पसंत; धर्मेंद्र आल्यानंतर लगेच ड्रेस बदलत होत्या इशा आणि आहाना
हा मराठी अभिनेता करतोय दुसऱ्यांदा लग्न, पहिली बायको ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री
‘बिग बॉस १४’ स्पर्धक अभिनेत्रीच्या मनात आला होता आत्महत्येचा विचार, ‘ अश्या प्रकारे केली नैराश्यावर मात!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.