Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

‘रंगीला’ गर्ल ऊर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याला तुम्ही पाहिले नाही? पहा फोटो

Prajakta Pandilwad by Prajakta Pandilwad
December 4, 2020
in ताज्या बातम्या, बाॅलीवुड, मनोरंजन, लेख
0
‘रंगीला’ गर्ल ऊर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याला तुम्ही पाहिले नाही? पहा फोटो

ही गोष्ट आहे एका खुप वेगळ्या अभिनेत्रीची. जिने लहानपणीच सिद्ध केले होते की, ती पुढे जाऊन खुप मोठी अभिनेत्री होणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे ऊर्मिला मातोंडकर. ४ फेब्रुवारी १९७४ मध्ये ऊर्मिला मातोंडकरचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला.

ऊर्मिलाच्या घरातील आर्थिक परिस्थिती खुप वाईट होती. म्हणून ऊर्मिलाचे बालपण खुप छोट्या घरात गेले होते. तिचे कुटुंब चाळीत राहत होते. ऊर्मिलाला लहानपणापासूनच अभिनयाची खुप जास्त आवड होती. म्हणून तिने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली.

अनेक मराठी चित्रपटांमध्ये ऊर्मिलाने बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ती ‘कलयुग’ चित्रपटामध्ये एका मुलाची भुमिका करताना दिसली. त्यानंतर १९८३ मध्ये ती शेखर कपूरच्या ‘मासूम’ चित्रपटामध्ये दिसली.

या चित्रपटात तिने शबाना आझमी आणि नसिरुद्दीन शाह अशा मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले. या चित्रपटातील भुमिकेसाठी ऊर्मिलाचे खुप जास्त कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर ऊर्मिलाने मुख्य अभिनेत्री म्हणून ‘चाणक्यम’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

‘नरसिंम्हा’ चित्रपटातून ऊर्मिलाने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला. तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले होते. त्यानंतर तिने चमत्कार, आ गले लग जा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ऊर्मिलाला बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली होती. पण ते यश मिळत नव्हते.

ज्याची ती वाट बघत होती. ऊर्मिलाने कधीही हार मानली नाही. ती बॉलीवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी संघर्ष करत होती. याच कालावधीमध्ये ऊर्मिलाची भेट राम गोपाल वर्मासोबत झाली. त्यांनी ऊर्मिलाला ‘रंगीला’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली.

या चित्रपटात अगोदरपासूनच जॅकी श्रॉफ आणि आमिर खान सारखे सुपेरस्टार्स काम करत होते. या चित्रपटात ऊर्मिलाने अतिशय उत्तम पद्धतीने अभिनय केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आणि ऊर्मिला रातोरात बॉलीवूडची स्टार झाली होती.

त्यानंतर ऊर्मिलाने राम गोपाल वर्मासोबत कौन, सत्या, प्यार तुने क्या किया अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ऊर्मिलाने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले. खुबसुरत, जुदाई, दौड, जंगल यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये ऊर्मिलाने काम केले आणि प्रसिद्धी मिळवली.

‘पिंजर’ हा ऊर्मिला मातोंडकरच्या करिअरमधला सर्वात उत्तम चित्रपट होता. या चित्रपटाने तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख निर्माण करून दिली होती. पण हळूहळू ऊर्मिला चित्रपटांपासून लांब जात होती. पण तरीही तिची प्रसिद्धी मात्र कमी झाली नव्हती.

ऊर्मिलाने अनेक वर्षे टेलिव्हिजनवर देखील काम केले. करिअरच्या सुरुवातीला अनेक अभिनेत्यांसोबत ऊर्मिलाचे नाव जोडले गेले होते. पण २०१६ मध्ये ऊर्मिलाने बिजनेस मॅन मोहसीन अख्खतर निरसोबत लग्न केले. लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रापासून पुर्णपणे लांब गेली.

ऊर्मिलाने २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश केला. तिने मल्याळम, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. आज ऊर्मिला अभिनय क्षेत्रापासून लांब आयुष्य जगत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘आशिकी’ फेम अभिनेता राहूल रॉयवर बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या फिदा

फक्त दहा चित्रपटांमध्ये रश्मीका मंदाना कशी झाली साऊथची टॉपची अभिनेत्री

अमिताभ बच्चनने केली त्यांच्या २८०० कोटी रुपयांच्या संपत्तीच्या वारसदाराची घोषणा

‘या’ पाच महागड्या गोष्टींची मालकीन आहे ऐश्वर्या राय बच्चन

Tags: bollywoodbollywood actressBollywood breaking newsentertainment मनोरंजनMoviesRangeela movieurmila matondakar
Previous Post

‘आशिकी’ फेम अभिनेता राहूल रॉयवर बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या फिदा

Next Post

शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या कंगणावर भडकला दिलजीत दोसांज, म्हणाला..

Next Post
शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या कंगणावर भडकला दिलजीत दोसांज, म्हणाला..

शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या कंगणावर भडकला दिलजीत दोसांज, म्हणाला..

ताज्या बातम्या

झोपडीत राहणाऱ्या मित्रासाठी मित्राने असे काही केले की…; वाचून तुम्हाला पण वाटेल आश्चर्य

झोपडीत राहणाऱ्या मित्रासाठी मित्राने असे काही केले की…; वाचून तुम्हाला पण वाटेल आश्चर्य

January 16, 2021
राष्ट्रवादीने डाव उलटवला! ‘सुसाईड नोटमध्ये लिहिलेली ‘ती’ नावं राष्ट्रवादीच्या नेत्याची नाही, तर..

पुण्यातील बँकेवर ED ची छापेमारी; राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

January 16, 2021
लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी कोव्हॅक्सिन लसीला विरोध! भारत बायोटेकने केली मोठी घोषणा…

लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी कोव्हॅक्सिन लसीला विरोध! भारत बायोटेकने केली मोठी घोषणा…

January 16, 2021
“हा’ तर शेतकऱ्यांकडूनच पैसे उकळण्याचा डाव”

“लस जर इतकीच सुरक्षित, तर मग सरकारमधील एखाद्याने ती का टोचून घेतली नाही?”

January 16, 2021
“आजोबांचे स्वप्न करणारा, वाघाचे हृदय असलेला खरा नातू आदित्य ठाकरे”; भाजपच्या दिग्गज नेत्याने केले कौतुक

“आजोबांचे स्वप्न करणारा, वाघाचे हृदय असलेला खरा नातू आदित्य ठाकरे”; भाजपच्या दिग्गज नेत्याने केले कौतुक

January 16, 2021
‘डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही’

‘अमेरिकेत गुंडगिरी करून ट्रम्प यांच्याकडून माझ्या पक्षाची बदनामी’

January 16, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.