‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेताचा खेळ खल्लास; अखेर सत्याचाच होणार विजय

स्टारप्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेला सध्या वेगळ वळण मिळालेलं पाहायला मिळतंय. दीपावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्तिकला आता ती नकोशी झाली आहे. तीचावरचा त्याचा विश्वास उडालेला पाहायला मिळतोय. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेतोय. तिच्या पोटातील मुले त्याची नाहीत, सुजयची आहेत. तुझ आणि सुजयच प्रेमप्रकरण खूप दिवसांपासून चालू आहे असे अनेक प्रकारचे आरोप करतो.

कार्तिक तिला पोटातील मुले माझीच आहे हे सिद्ध करण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यासाठी फोर्से करतो. परंतु दीपा त्याला स्पष्ट नकार देते कारण तो तिच्या चारित्र्याचा आणि स्वभिनाचा प्रश्न असतो. त्यामुळे कार्तिक देखील मनोमन चुकीचा विचार करतो, आणि तिला घराबाहेर जाण्यासाठी सांगतो.

दिपाही स्वाभिमान न हरता घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. त्यांच्या दोघांच्या भांडणामुळे सौंदर्याला हृदय-विकाराचा झटका येतो. नंतर नेहमीप्रमाणे कार्तिक हॉस्पीटला जायला लागतो,त्यादरम्यान डॉ. कुणाल यांच्या आईची तब्येत बिघडते. हे तेच डॉ. कुणाल ज्यांनी श्वेताला दीपा आणि कार्तिक यांच्यामध्ये फुट पडण्यास मदत केली. कार्तिकचे खोटे रिपोर्ट तयार केले.

कार्तिक कुणालच्या आईला धोका नको म्हणून मोठे डॉक्टर बोलावून त्यांची शस्त्रक्रिया करतो. कार्तिकने त्याच्या आईसाठी घेतलेली मेहनत पाहून डॉ कुणाल ला खूप वाईट वाटते. त्याला वाटते की, ज्या व्यक्तीचा मी संसार उद्धवस्त केला त्याच व्यक्तीने आज माझ्या आईचे प्राण वाचवले. या पश्चात्तापामुळे तो कार्तिकला श्वेताबद्दल सर्वकाही खरे सांगतो.

कुणाल कार्तिकला सांगतो की, कसे त्याने फर्टि’लिटी सॅ’म्पल बदलले आणि रि’पोर्ट सुद्धा बदलले. श्वेतामुळे त्यांचा एवढा मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. कार्तिकला खूप वाईट वाटते, दिपाबरोबेर चुकीच वागल्याचा पश्चाताप होतो. आणि तो श्वेताच पितळ उघड पडायचं ठरवतो.

कार्तिक श्वेताला जाब विचारतो, केलेल्या कारस्थानांची कबुली द्यायला सांगतो. परंतु श्वेता हे सगळ मान्य करत नाही मग तो डॉ. कुणालला बोलावून सगळ सत्य सांगायला सांगतो. कुणाल श्वेतानी केलेल्या कारस्थानांबद्दल आणि त्याने तिला कशी साथ दिली याबद्दल सांगतो.

श्वेताची कटकारस्थाने ऐकून आदित्यला राग येतो आणि तो श्वेताला मारू लागतो. सौदर्या त्याला आवरते आणि तीही आपला संताप व्यक्त करते. सौदर्या कार्तिकला दीपाला शोधण्यासाठी सगळे प्रयत्न करू असे सांगते. आता दीपा कधी आणि कुठ सापडणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये केलच.

हे ही वाचा- 

कोरोना लसीचा दुसरा डोस नाही घेतला तर काय होईल? वाचा डॉक्टर काय म्हणाले

अभिनायाबरोबेर खेळातही तरबेज होता महाभारतातील भीमा, जिंकले होते गोल्ड मेडल; जाणून आश्चर्य वाटेल

बॉलीवूड सरसावले; अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना थेट लंडनहुन आणणार ऑक्सिजन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.