शिवसेनेच्या नेत्याने राणे पिता-पुत्रांना दिली लाल तोंडाच्या माकडाची उपमा

 

मुंबई | शिवसेना उपनेते, नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका यशवंत जाधव यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणे पिता-पुत्रांना लाल तोंडाच्या माकडाची उपमा दिली आहे.

कोणत्याही घाटात लाल तोंडाची माकडे दिसतात. त्यातली तीन माकडे चुकून राजकारणात आली असून ही माकडे या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत आहेत. पण आता सगळ्या फांद्या संपल्या असूनही त्यांच्या उड्या काही संपत नसल्याचे यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

यशवंत जाधव यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली आहे. ट्विटमध्ये ते पुढे म्हणतात, आता पुढची उडी ही माकडे कुठे मारणार हे त्या नारायणालाच ठाऊक असेल.

पंढरपूरला जाऊन लांबून दर्शन घेतलेले आणि हातात हार सुद्धा न घेतलेले अयोध्येत जाऊन किती लांबून रामाचे दर्शन घेणार? बेबी पेंग्विन सोबत जात असेल तर एसीची सोय करून ठेवा! पेग्विनला थंड हवा लागते. नाहीतर लगेच गाडीत पळून बसतो अशा शब्दात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडलं होतं.

शिवसेनेच्या यशवंत जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर केलेल्या या टीकेला नितेश राणे कशाप्रकारे प्रत्युत्तर देतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.