13 बोलेरो गाड्यांच्या मालकांना बँकेच्या नोटीसा, राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग । भाजप खासदार नारायण राणे हे सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आता नितेश राणे यांच्या ताफ्यात दिसणारी आणि रत्नागिरीच्या देवेंद्र वणजू यांच्या नावावर खरेदी झालेली इनोव्हा सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे.

याप्रकरणी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी खरेदी करण्यात आलेल्या 13 बोलेरो आणि एक इनोव्हा या गाड्यांच्या मालकांना 15 लाखांहुन अधिक रक्कमेच्या थकीत कर्जापोटी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने 101 च्या नोटीसा बजावल्या आहेत.

यामुळे आता राणे हे अडचणीत आले आहेत. तेरा गाड्यांपैकी चार गाड्या आमच्या संचालकांच्या नावावर होत्या. आम्ही त्यावेळी पक्षाचे पदाधिकारी होतो पण जिल्हा बॅंकेच्या संचालक पदामधून आम्ही बाद होऊ नये म्हणून या बोलेरो गाड्यांचे पैसे आम्ही आमच्या स्वत:च्या अकाउंटमधून भरलेले आहेत.

आज या गाड्या नितेश राणे किंवा राणेंच्या ताफ्यात या गाड्या वापरल्या जातात. त्यांच्या बंगल्याच्या आवारात या गाड्या असतात. या आजही गाड्या आमच्या ताब्यात नाही, असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले आहे.

आज ह्याच राजकारण करता कामा नये. प्रत्येकाचे विषय आहेत. आज जो बँकेचे पैसे वापरतो त्यात शिवसेनेचे लोक नाहीत? त्यात काँग्रेसचे नाहीत? राष्ट्रवादीचे लोक नाहीत का ? त्या त्या वेळी ज्याच्या ज्याकडे सत्ता होती त्या त्यावेळी त्यांनी असे केलेले आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. हे प्रकरण आता तापण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.