‘या’ अभिनेत्यानं केलं सहअभिनेत्याला लिपलॉक; व्हिडीओ पाहून लोकांची बोलती बंद

मुंबई | आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेला अभिनेता  रणदीप हुड्डा. यशस्वी अभिनेता म्हणून नावारुपाला येत असतानाच त्याच्या अफेअर आणि लिंक अपच्या चर्चाही तितक्याच रंगल्या. त्याची अभिनेत्रीला नव्हे तर अभिनेत्यासोबतचा किसिंग सीन रंगली.

‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमात रणदीप मुलीच्या नाहीतर मुलाच्या प्रेमात पडतो. एका समलैंगिक व्यक्तीची भूमिका त्याने साकारली होती. या सिनेमात त्याने दमदार परफॉर्मन्स दिला होता. इतकेच नाहीतर भूमिकेची गरज म्हणून सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन करायचा होता.

View this post on Instagram

😎

A post shared by Randeep Hooda (@randeephooda) on

त्याच्या या सीननंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. त्यासोबतच या सीनचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. हा सिनेमा हटके आणि तितकाच बोल्ड होता.

विमान कंपनीत काम करणारा रणदीप ते आजचा स्टार अभिनेता रणदीप हुड्डा असा मोठा यशस्वी आणि खडतर प्रवास रणदीपने पार केला आहे.  विविध अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं. अभिनेत्री अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंह आणि लीसा हेडन यांच्याशी रणदीपचे नाव जोडलं गेलं.

याशिवाय दोन वर्षे त्याने सुष्मिता सेनला डेट केलं होतं. यानंतर नीतू चंद्रासोबतही तो रिलेशनशिपमध्ये होता. अफेअरशिवाय रणदीप त्याच्या बोल्ड सीनमुळेही चर्चेत राहतो. दोनवेळा तर त्याच्या चित्रपाटाचे बोल्ड इंटिमेट सीन लीक झाले होते.

प्रसिद्ध छायाचित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर रंगरसिया चित्रपटातील अनेक बोल्ड सीन लीक झाले होते. या सीनमुळे हा चित्रपट तुफान चर्चेत आला होता. याशिवाय त्याच्या साहेब बीवी और गँगस्टर चित्रपटातील अभिनेत्री माही गिलसोबतचाही बोल्ड सीनही लीक झाला होता.

दरम्यान लॉकडाऊनच्या आधीच आयुषमान खुरानाचा ‘शुभ-मंगल ज्यादा सावधान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमामध्ये आयुषमाननेही आपल्या सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.