Share

रणधीर कपूर यांची भिकाऱ्याने उडवली होती खिल्ली, हसत हसत म्हणाला, ‘एवढी छोटी गाडी वापरता का?’

randhir-kapoor.j

नुकतेच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर त्यांची मुलगी करिश्मा कपूरसोबत आले होते. या स्पेशल एपिसोडमध्ये कपिल शर्माने करिश्मा कपूर आणि रणधीर कपूरसोबत भरपूर गप्पा मारल्या. अभिनेते रणधीर कपूर यांचा मनमोकळा स्वभाव आहे. त्यामुळे या एपिसोडमध्ये अभिनेते रणधीर कपूर यांच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.(randhir kapoor shear story in kapil sharma show )

‘द कपिल शर्मा शो’ च्या स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेते रणधीर कपूरने यांनी आयुष्याशी निगडित एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा एका भिकाऱ्याशी संबंधित आहे. अभिनेते रणधीर कपूर यांना एका भिकाऱ्याने त्यांची जागा दाखवून दिली. या घटनेने अभिनेते रणधीर कपूर खूप दुखावले गेले. पण ते नाराज झाले नाहीत.

रणधीर कपूर यांनी सांगितले की, “जेव्हा मला काम मिळू लागले आणि चांगली कमाई होऊ लागली. त्यावेळी मी एक छोटी कार खरेदी केली. याचं गाडीने माझं येणं-जाणं सुरु झाले.” अभिनेते रणधीर कपूर पुढे म्हणाले की, मी एके दिवशी नवीन घेतलेल्या गाडीने प्रवास करत होतो. त्यावेळी मला रस्त्यावर एक भिकारी भेटला.”

“तो भिकारी माझ्या गाडीकडे बघून हसू लागला आणि म्हणाला, एवढी छोटी गाडी. चित्रपटात तर खूप मोठ्या गाड्या असतात.”, असे अभिनेते रणधीर कपूर यांनी कार्यक्रमात सांगितले. भिकाऱ्याचे बोलणे अभिनेते रणधीर कपूर यांच्या जिव्हारी लागले. यानंतर निर्मात्यांकडून आणि आपल्या पत्नीकडून पैसे मागितले.

या मिळालेल्या पैशातून त्यांनी एक आलिशान कार खरेदी केली. ही गाडी घेऊन अभिनेते रणधीर कपूर त्यांच्या वडिलांच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी वडिलांना सांगितले की, “तुम्ही देखील एखादी नवीकोरी मोठी कार खरेदी करा.” यावेळी अभिनेते रणधीर कपूर यांना त्यांचे वडील अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांनी उत्तर दिले, ते महत्वाचे आहे.

त्यानंतर राज कपूर यांनी अभिनेते रणधीर कपूर यांना सांगितले की, “बाळा तुला ही गाडी हवी आहे. मला याची गरज नाही. जर मी बसमध्ये कुठेही गेलो तर लोक म्हणतील की, बघा राज कपूर बसमध्ये बसले आहेत.” रणधीर कपूरचा हा किस्सा ऐकून चाहते मोकळेपणाने हसले आणि कपिल शर्माला देखील हसू आवरता आले नाही.

महत्वाच्या बातम्या :-
‘संज्याने जी भाषा पत्रकार परिषदेमध्ये वापरली ती महाराष्ट्राच्या कुठल्या संस्कृतीत बसते हे शिवसेनेने सांगावं’
“संजय राऊतांना गरज लागली तेव्ही मी आर्थिक मदत केली”; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
‘या फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहत्यांचे वाढले टेन्शन, पहा फोटो

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now