Share

६ बीएचके फ्लॅट, महागडी गाडी, डायमंड नेकलेस; रणबीर-आालियाला लग्नात मिळाले करोडोंचे गिफ्ट्स

जवळपास पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या जोडप्याने 14 एप्रिल रोजी कुटूंबियांच्या उपस्थितीत लग्न केले आहे. या लग्न सोहळ्याला कुटूंबियांसोबत रणबीर-आलियाचे काही खास मित्रही उपस्थित होते. रणबीर-आलिया(Ranbir-Alia) यांचे लग्न आरके हाऊसमध्ये पार पडले.(Ranbir-Alia got crores  gifts at their wedding)

रणबीर-आलिया यांच्या लग्नाचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्न सोहळा पार पडल्यानंतर रणबीर आणि आलियाने मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी खास वेडिंग पार्टीचे देखील आयोजन केले होते. यादरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या नवीन जोडप्याला भेटवस्तू दिल्या आहेत.

या भेटवस्तूंची सध्या जोरदार चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता रणबीर कपूरची बहीण करीना कपूरने आलियाला डायमंड नेकलेस गिफ्ट केला आहे. या डायमंड नेकलेसची किंमत सुमारे ३.१ लाख रुपये आहे. तसेच अभिनेत्री कतरिना कैफने आलियाला प्लॅटिनम ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिले आहे.

या ब्रेसलेटची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त अभिनेता रणवीर सिंगने रणबीरला नवीन कावासाकी निन्जा H2R ही बाइक गिफ्ट केली आहे. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोणने या जोडप्याला एक महागडे घड्याळ भेट म्हणून दिले आहे. या घडाळ्याची किंमत सुमारे १५ लाख रुपये आहे. तसेच आलियाचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राने एक हँडबॅग भेट दिली आहे.

या हँडबॅगची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टमध्ये चांगली मैत्री आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने आलीय भट्टला एक हिऱ्याचा आकर्षक हार भेट म्हणून दिला आहे. या हारची किंमत सुमारे ९ लाख रुपये आहे. तसेच दिग्दर्शक अयान मुखर्जीने या जोडप्याला Audi Q8 ही कार भेट म्हणून दिली आहे. या कारची किंमत १.३ कोटी रुपये आहे.

अभिनेता अर्जुन कपूरने रणबीरला एक जॅकेट गिफ्ट केलं आहे. या जॅकेटची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. तसेच अभिनेत्री अनुष्का शर्माने आलियाला एक ड्रेस गिफ्ट केला आहे. या ड्रेसची किंमत १.६ लाख रुपये आहे. हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला आहे. याशिवाय रणबीर-आलियाला सासू सोनी राजदानने एक ६-BHK फ्लॅट भेट म्हणून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
infosys च्या गुंतवणूकदारांची उडाली झोप, ९ टक्क्यांनी कोसळला शेअर, ४८ हजार कोटी बुडाले
मी जेव्हा तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा.., हर्षल पटेलची बहिणीसाठी भावूक पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
ब्रेकिंग! भोंग्यांबाबत आता राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, पोलीस प्रमुखांना दिले ‘हे’ आदेश

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now