Share

पॉलिटिकल थ्रिलर, क्राइम, बोल्ड इंटिमेट सीन; ‘रानबाजार’च्या ट्रेलरने मराठी सिनेसृष्टीत भूकंप

सध्या चर्चेत असलेल्या ‘रानबाजार’ या मराठी वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरवरून ही वेबसिरीज राजकीय कथेवर आधारित असल्याचे दिसत आहे. ‘रानबाजार'(Ranbajar) या वेबसिरीजमध्ये मराठी कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकार आहेत. या वेबसिरीजमध्ये अभिनेते मोहन आगाशे, सचिन खेडेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.(ranbajar marathi wbseries trailer release)

याशिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. या ट्रेलरमधून अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. या ट्रेलरवरून ही मराठीतील सर्वात बोल्ड सिरीज असल्याचे संगितले जात आहे. या वेबसिरीजची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

२० मे ला ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्लॅनेट मराठी या निर्मिती संस्थेने ‘रानबाजार’ वेबसिरीजची निर्मिती केली आहे. अभिजित पानसे यांनी ‘रानबाजार’ या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी ‘रानबाजार’ वेबसिरीजचे दोन टीझर प्रदर्शित झाले आहेत. या टीझरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी इंटिमेट सीन देताना दिसत आहे.

अनेकांनी या वेबसिरीजच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट करत म्हंटले की, “टीझरप्रमाणे या वेबसिरीजचा ट्रेलर देखील भारी आहे. वेबसिरीजची आतुरतेने वाट पाहतोय.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हंटले की, “खूप दिवसानंतर राजकीय कथा पाहायला मिळणार आहे. ‘रानबाजार’ ची वाट पाहतोय.”

काही दिवसांपूर्वी या वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित झाला होता. हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या टीझरवरून अनेकांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर टीका देखील केली होती. काही जणांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे या भूमिकेसाठी कौतुक देखील केले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या वेबसिरीजसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘रानबाजार’ ही मराठीतील सर्वात मोठी वेबसिरीज असल्याचे सांगितले जात आहे. या वेबसिरीजची सध्या जोरदार चर्चा आहे. सध्या मराठी चित्रपट आणि वेबसिरीज मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होतं आहेत. प्रेक्षक देखील नवीन विषयांना पसंती देत आहेत. मराठी दिग्दर्शक सध्या चौकटीबाहेरचे विषय हाताळताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
३३ वर्षीय अभिनेत्याने १५ वर्षीय रेखाचा जबरदस्तीने घेतला होता किस, त्यानंतर १० वर्षांनी…
Doctor Strange मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला बाल लैंगिक शोषण प्रकरणी ८ वर्षांचा तुरूंगवास
“महिला आयोगाचे अध्यक्षपद फक्त एक महिना माझ्या ताब्यात द्या, कायदा काय असतो दाखवून देईल”

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now